Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर भिडले? वाद जाणार शिंदे दरबारी

Thane News : ठाणे शहरात शिवसेनाचा वाद पुन्हा समोर आला आहे. शिवसेनेतील या गटात मागील महिन्यातही वाद झाला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करुन वाद सोडवावा, अशी मागणी दोन्ही गटांकडून करण्यात आली आहे.

ठाणे शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर भिडले? वाद जाणार शिंदे दरबारी
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 4:47 PM

निखिल चव्हाण, ठाणे : ठाणे शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाण्यात शिवसेनेच्या दोन गटात राडा झाला आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. हा वाद विकोपाला गेले असून प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी दोन्ही गटाने केली आहे. काही दिवसांपूर्वी या दोन्ही गटात वाद झाला होता. तो वाद शांत होत नाही तोपर्यंत पुन्हा नवीन वाद झाला आहे.

कोणामध्ये झाला वाद

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे दिलीप बारटक्के यांच्या गटात हा वाद झाला आहे. या वादामुळे शिंदे गटामधील गटबाजीचे दर्शन पुन्हा झाले आहे. वर्तक नगर येथील कन्स्ट्रक्शन साईडवरील काम मिळण्यावरून प्रताप सरनाईक गट आणि दिलीप बारटक्के गट एकमेकांसमोर आले आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांच्या माणसांनी ट्रक तोडल्याचा बारटक्के गटाकडून आरोप केला आहे. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून न्याय देण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

मागील महिन्यात झाला होता वाद

ठाणे शहरातील बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर कामगारांना घरे मिळावी, यासाठी प्रताप सरनाईक यांनी मागील महिन्यात आंदोलन केले होते. त्याचवेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनीही कार्यकर्त्यांसह कंपनीमध्ये जाऊन घोषणाबाजी केली. आपण दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. त्यानुसार स्थानिकांना कामे मिळालेली असल्याचा दावा त्यांनी केला होता.

सरनाईक विरुध्द बारटक्के

दिलीप बारटक्के व पूर्वेश प्रताप सरनाईक लोकमान्य नगरात एकाच प्रभागात नगरसेवक होते. या दोघांमध्ये पूर्वीपासूनच मतभेद असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर असते. राज्यात सत्ता आल्यानंतर हा वाद मिटेल, अशी अपेक्षा असताना त्यांच्यात पुन्हा वाद पेटला आहे. आता या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा तोडगा काढतात? हे पाहणे गरजेचे आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.