महाविकास आघाडीचे जागा वाटप रखडले, पण काँग्रेसचा दावा असलेल्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार
Lok Sabha Election Maharashtra Politics: शिवसेना उबाठाने आपली यादी जाहीर केली. त्यात सांगली, मुंबई दक्षिण या जागांचा समावेश आहे. त्यात अजून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबडेकर यांचाही महत्वाची भूमिका आहे. महाविकास आघाडीकडून त्यांना हव्या त्या जागा मिळत नसल्यामुळे ते महाविकास आघाडीची साथ सोडणार आहे.
शिवसेना उबाठाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु या यादीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण या १६ जागांपैकी अनेक जागांवर काँग्रेसकडून दावा केला जात आहेत. यामध्ये सांगली, मुंबई दक्षिण या जागांचा समावेश आहे. त्यात अजून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबडेकर यांचाही महत्वाची भूमिका आहे. महाविकास आघाडीकडून त्यांना हव्या त्या जागा मिळत नसल्यामुळे ते महाविकास आघाडीची साथ सोडणार आहे.
शिवसेना उबाठाकडून 22 जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील 16 उमेदवारांची यादी संजय राऊत यांनी जाहीर केली. आता एकूण 17 जागा शिवसेना उबाठाकडून जाहीर झाल्या आहेत. त्यात बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ- संजय देशमुख, मावळ – संजोग वाघेरे- पाटील, सांगली -चंद्रहार पाटील, हिंगोली- नागेश अष्टीकर, छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे, धाराशीव- ओमराजे निंबाळकर, शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक- राजाभाऊ वाझे, रायगड – अनंत गिते, रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत, ठाणे- राजन विचारे, मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील, मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत, मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर, मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई, परभणी- संजय जाधव यांचा समावेश आहे.
या जागांवर काँग्रेसचा दावा
उद्धव ठाकरे UBT कडून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघासाठी अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली. या ठिकाणी काँग्रेसकडून वर्षा गायकवाड इच्छूक आहेत. तसेच सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा आहे. मुंबई वायव्यमधून अमोल किर्तिकर यांना उमेदवारी दिली. किर्तिकर यांच्याभोवती खिचडी घोटाळा प्रकरणात ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. आजच त्यांना चौकशीसाठी ईडीने बोलवल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईत या चर्चेतील लढती
72 वर्षीय अरविंद सावंत यांना पुन्हा दक्षिण मुंबईतून तिकीट दिले आहे. या ठिकाणावरुन ते दोन वेळा खासदार झाले आहे. त्यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. शिवसेनेतील जे पाच खासदार शिंदे सेनेत गेले नाहीत, त्यातील एक अरविंद सावंत आहे. 55 वर्षीय संजय दीना पाटील 2004 मध्ये भांडूप विधानसभा मतदार संघातून आमदार झाले. 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून मुंबई मुंबई नॉर्थ ईस्टमधून खासदार झाले. परंतु 2014 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. आता यंदा त्यांचा सामना मिहिर कोटेचा विरोधात आहे. ते 2019 मध्ये शिवसेनेत दाखल झाले होते.