‘मी आई-बहि‍णींची माफी मागतो’, अंबादास दानवे यांच्या शिवीगाळवर ठाकरेंकडून माफी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भर सभागृहात केलेल्या शिवीगाळवर त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली आहे. "अंबादास दानवे यांनी केलेल्या शिवीगाळवर मी महाराष्ट्रातील माता-भगिणींची माफी मागतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण सत्ताधारी काही आमदारांनीदेखील महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

'मी आई-बहि‍णींची माफी मागतो', अंबादास दानवे यांच्या शिवीगाळवर ठाकरेंकडून माफी
उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 3:54 PM

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भर सभागृहात आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. यावेळी दोन्ही बाजूने शिवीगाळ करण्यात आली. या घटनेवर आता सर्वच स्तरावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दानवे यांच्या शिवीगाळनंतर विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित केलं. विधान परिषदेच्या सभापतींच्या या कारवाईवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेत्यांवर षडयंत्र रचून निलंबनाची कारवाई करण्यात आली, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केली. याचवेळी त्यांना दानवे यांनी केलेल्या शिवीगाळबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील सर्व माता भगिणींची माफी मागितली. यासोबतच त्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या काही नेत्यांची नावे घेत त्यांनीदेखील माफी मागावी किंवा त्यांच्यावरही अंबादास दानवे यांच्यासारखी कारवाई व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“अंबादास दानवे यांच्याबद्दल आक्षेप काय आहे? ते सांगा. का निलंबन केलं? त्यांनी शिवीगाळ केली. बरोबर आहे. त्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील माता भगिणींची माफी मागायला तयार आहे आणि मी माफी मागतो. कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच. मग लोकसभा प्रचारादरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासभेत कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील, पण मुनगंटीवार यांनी बहीण-भावाबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याबद्दल कोण माफी मागणार आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

“त्यांच्याचमध्ये बसलेले शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना कॅमेऱ्यासमोर शिवी दिली होती. हा माता भगिणींचा अपमान नाही? ज्यांच्यावरती एका महिलेवर विचित्र प्रसंग ओढवला, ज्यांना आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं, त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलंय हा महिलांचा अपमान नाही?”, असा देखील सवाल ठाकरेंनी केला.

‘तर मी माफी मागतो’

“माता भगिणींचा अपमान झाला असेल तर मी माफी मागतो. पण तसा त्यांनीदेखील माता भगिणींचा अपमान केला आहे. सभागृहात केला तर अपमान आणि जाहीर वक्तव्य केलं तर अपमान नाही, हे कुठलं गणित आहे. मग त्यांनासुद्धा निलंबित करणार का? सुधीर मुनगंटीवार यांना तिथल्या जनतेने निलंबित केलंच आहे, विधानसभेतही त्यांना जनता निलंबित करेल. पण तुम्ही आतमध्ये काय करणार आहात?”, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.

Non Stop LIVE Update
जरांगेंचा अल्टिमेटम अन काय करणार सरकार? सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार?
जरांगेंचा अल्टिमेटम अन काय करणार सरकार? सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार?.
शिवसेना,राष्ट्रवादीवर सुप्रीम फैसला, विधानसभेच्या आधी काय येणार निर्णय
शिवसेना,राष्ट्रवादीवर सुप्रीम फैसला, विधानसभेच्या आधी काय येणार निर्णय.
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील.
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...