Anil Parab | अनिल परब यांचा सर्वात मोठा दावा, पालकमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा

अनिल परब यांनी आता पालकमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी हा इशारा दिला. त्यामुळे आता अनिल परब काय गौप्यस्फोट करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Anil Parab | अनिल परब यांचा सर्वात मोठा दावा, पालकमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 4:50 PM

निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह पक्षाच्या काही नेत्यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली. मुंबई महापालिका प्रकल्प, बीएमसीकडून केली जाणारी कामे, दिली जाणारी कंत्राटे, मुंबईकरांचे प्रश्न याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. महापालिकेत सॅनिटरी नॅपकिन मशीन खरेदी-विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनिल परब यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झालीय. या बैठकीनंतर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली.

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना बीएमसी मुख्यालयात केबिन दिल्यानंतर याला मोठा विरोध ठाकरे गटाने केला होता. याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली तेव्हा मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी पालकमंत्र्यांचा घोटाळा काढणार असल्याचा मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे अनिल परब आणि इतर ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

“अधिवेशनाच्या सत्रामध्ये मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारा संदर्भात काही गोष्टी मी सभागृहात मांडल्या होत्या. तत्कालीन मंत्र्यांनी मला या मुंबईमधून पालिकेच्या प्रशासनासंदर्भात चुकीची माहिती दिली होती. त्यामुळे मी हक्क भंग या संदर्भात मांडला होता. चुकीची माहिती दिल्यामुळे हा हक्क भंग मी मांडला होता. आयुक्तांनी मला आज वेळ दिला. यावेळी मी विधान परिषदेत मांडलेले मुद्दे आजच्या बैठकीत मांडले”, असं अनिल परब यांनी सांगितलं

सॅनिटरी नॅपकिन मशीन घोटाळ्याचा नेमका आरोप काय?

“सॅनिटरी नॅपकिन मशीन घोटाळ्यासंदर्भात सगळी वस्तुस्थिती मांडली. या मशीनची किंमती आणि त्याचं कार्य यावर चर्चा झाली. मुंबई महापालिकेने मला आश्वासित केलंय की, 5000 मशीनचा कॉन्ट्रॅक्ट होता. त्यातील फक्त 200 मशीन आम्ही प्रायोगिक तत्त्वावर घेऊन पायलट प्रोजेक्ट करू. यामध्ये फीडबॅक चांगला आला तरच हा प्रोजेक्ट आम्ही पुढे घेऊन जाऊ, असं बीएमसी कडून सांगण्यात आलंय”, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.

ब्लॅकलिस्ट कंपनीबाबत अनिल परब काय म्हणाले?

“दुसरा विषय म्हणजे एका ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला दुसऱ्या टेंडरमध्ये काम करण्याची संधी दिलीय. त्या टेंडरमध्ये सुद्धा खोटी कागदपत्रे या कंपनीकडून देण्यात आली होती. या संबंधित ब्लॅकलिस्ट कंपनीवर गुन्हा दाखल झालाय. मुंबई महापालिका काय फॉलोअप घेत आहे, या संदर्भात आम्ही विचारणा केली. ही कंपनी आता परमनंट ब्लॅक लिस्ट झालीय”, असं अनिल परब म्हणाले.

“एक टीडीआर घोटाळ्याचा विषय होता. माहीममधील जागा रेल्वेची आहे की बीएमसीची हे माहीत नव्हतं. बिल्डरने ही जागा खाली केली होती. 17 लोकांच्या घरांचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र त्यांना बेघर करणार नाही, असं बीएमसीने सांगितलं”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. “निधी वाटपाचा विषय आजच्या बैठकीत मी घेतला नाही. कारण हक्क भंग संदर्भात मी आज बैठकीत चर्चा केली. निधी वाटपा संदर्भात आम्ही सर्व आमदार, नगरसेवक एकत्र येऊन तो विषय मांडणार आहोत”, असंही ते म्हणाले.

‘पालकमंत्र्यांचा घोटाळा काढू’

“पालकमंत्र्यांचा घोटाळा सुद्धा आम्ही लवकरच समोर मांडू”, असा मोठा इशारा अनिल परब यांनी दिला. “आयुक्तांना मी हे सांगितलं. आम्ही तुम्हाला आवडो न आवडो लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे”, असं अनिल परब म्हणाले. मुंबई महापालिके संदर्भात इतर प्रश्न माजी नगरसेवक आणि आमदारांना सोबत घेऊन पुढे आम्ही मांडणार आहोत. विधान परिषद आमदार असल्यामुळे माझ्याकडे 13 हत्यार आहेत, ज्यातून मी जनतेचे प्रश्न मांडू शकतो. त्यामुळे मला भेट नाकारणे हे संविधानाची पायमल्ली करण्यासारखं आहे, असं अनिल परब म्हणाले.

‘आमदार बेलगाम’

“आमदार कसे बेलगाम झाले आहेत, कायदा आणि संस्थेची भीती राहिली नाही. मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वाद त्यांना आहेत. यांच्या विरोधात कोणीही आवाज उचलत नाहीय. आम्ही एक कानाखाली मारली तर आमच्या कार्यकर्त्यांना दहा दिवस जेलमध्ये ठेवलं. या आमदारांचा तुम्ही काय करणार?”, असा सवाल अनिल परब यांनी केला. पाचोऱ्यातील किशोर पाटील आणि एका पत्रकार यांच्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.