Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातोश्री बाहेर येऊन उद्धव ठाकरेंची तुफान बॅटींग, जिप्सीवरुन भाषण करत करुन दिली बाळासाहेबांची आठवण

धनुष्यबाण चोरणारे मर्द असेल तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला.

मातोश्री बाहेर येऊन उद्धव ठाकरेंची तुफान बॅटींग, जिप्सीवरुन भाषण करत करुन दिली बाळासाहेबांची आठवण
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 3:46 PM

मुंबई : धनुष्यबाण कुणी चोरलं हे तुम्हाला माहीत आहे. निवडणुकीत या लोकांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. योगायोग असो काही असो आज महाशिवरात्री आहे. या दिवसांचा महुर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलं. धनुष्यबाण चोरलं. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारलं आहे. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याचा स्वाद घेतला आहे. पण आता त्यांना डंख मारण्याची वेळ आली आहे. तुम्ही चिडलेला आहे. आजपर्यंत कोणताही पक्ष नसेल की त्यांच्यावर असा आघात कोसळला नसेल, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (shiv sena uddhav balasaheb thakre) यांनी केला. मातोश्री बाहेर येऊन त्यांनी जिप्सीवरुन भाषण करुन देत बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची आठवण करुन दिली.

भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असेल यंत्रणा हाताशी घेऊन पक्ष संपवता येईल. पण त्यांच्या किती पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही. माझं आव्हान आहे. निवडणूक आयुक्तांनी काल गुलामी केली. निवृत्त झाल्यावर ते राज्यपाल होतील. त्यांची गुलामी ठरवली आहे. माझे गुलामांना आव्हान आहे. शिवसेना कुणाची हे जनतेला ठरवू द्या.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेबांचा मुखवटा घालून मोदींनी मागितली मते

आता त्यांचा डाव सुरू आहे. त्याना ठाकरे नाव पाहिजे. बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे. पण ठाकरे कुटुंब नको. त्यावेळी मोदींची नाव घेऊन मते मागितल्याचं सांगत होता. तेव्हा युती होती. एक जमाना होता लोक मोदींचे मुखवटे घालू येत होते. आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून मते मागावी लागत आहे

मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालवा लागतो हा आपला मोठा विजय आहे. महाराष्ट्रातील जनतेला असली नकली कोण हे माहीत आहे. आव्हान देतोय ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव चोरायला दिलं गेलं. आपला धनुष्यबाण चोराला दिला. ज्या पद्धतीने आणि कपट कारस्थानाने सुरू आहे.

मशालही काढतील. माझं आव्हान आहे. धनुष्यबाण चोरणारे मर्द असेल तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. या चोरांनाही पेलता येणार नाही. हे मी सांगतो. मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्हा आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून आपण त्याच्या छाताडावर उभा राहील.

उद्या फेसबुक लाइव्ह

उद्या फेसबुक लाइव्ह करेल. निवडणूक आयोगाने काय काय सांगितलं होतं ते मी विस्ताराने सांगितलं. काँग्रेस फुटली त्यामुळे चिन्हं गोठवलं. पण दुसरं चिन्हं दिलं नव्हतं. वाद झाला तेव्हा मुख्य चिन्ह आणि नाव दिलं नाही. हा इतिहास आहे. पण पंतप्रधानांच्या गुलाम आयुक्तांनी केलं आहे. लढाई सुरू आहे. माझ्या हातात काही नाही. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही.

एवढेच सांगतो. तुमचे रक्त पेटवलं आहे. तरी संयम पाळलेला आहे. शिवसेनेचा तो राग खवळू देऊ नका. तुम्हा सर्वांना मी पुढच्या सूचना देत जाईल. आज सुद्धा… तुम्ही कालचा फोटो पाहिलात का रे… माझा चेहरा कसा होता. ज्याच्या हातात धनुष्यबाण होतं त्याचा चेहरा कसा होता. त्याचा चेहरा मीच चोर आहे अशी पाटी लावल्यासारखा चेहरा होता. आजपासून निवडणुकीच्या कामाला लागा…

तुम्हाला एक सांगतो. मी तुम्हाला भेटायला आलो. आतमध्ये गर्दी मावली नसती. मी तुम्हाला भेटायला रस्त्यावर आलो आहे. शिवरायांचा भगवा घेऊन मी तुमच्यासोबत राहील. हीच शपथ घेऊन पुढे जाऊ या. शिवसैनिक जोपर्यंत जिवंत आहेत. तोपर्यंत कुणाच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवू शकत नाही.

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....