‘मातोश्री’हून गाडी निघाली, आणि पोहोचली थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास्थळी, ठाकरे पिता-पुत्रांकडून बांधकामाची पाहणी

बाळासाहे ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालंय, याची माहिती उद्धव ठाकरे घेत आहेत. मुंबईच्या दादर येथे बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक उभारलं जात आहे.

'मातोश्री'हून गाडी निघाली, आणि पोहोचली थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास्थळी, ठाकरे पिता-पुत्रांकडून बांधकामाची पाहणी
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 6:20 PM

मुंबई : राज्य आणि देशात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. त्याआधी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होणे अपेक्षित आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपून बराच काळ लोटला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. असं असताना मुंबईत काही महत्त्वाच्या घडामोडी बघायला मिळत आहेत. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी पोहोचले आहेत.

बाळासाहे ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालंय, याची माहिती उद्धव ठाकरे घेत आहेत. मुंबईच्या दादर येथे बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक उभारलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मारकाचं काम सुरु आहे. याच स्मारकाचं काम कुठपर्यंत आलं ते पाहण्यासाठी उद्धव ठाकरे आज स्मारकाच्या बांधकामस्थळी पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे देखील स्मारकाच्या कामांच्या पाहणीसाठी आले आहेत. पण एमएमआरडीएचे चेअरमन श्रीनिवासन इथे अनुपस्थित आहेत.

उद्धव ठाकरे दाखल झाल्यानंतर एमएमआरडीएचे चेअरमन आले

उद्धव ठाकरे स्मारकस्थळी पोहोचले तेव्हा एमएमआरडीएचे चेअरमन श्रीनिवासन तिथे नव्हते. श्रीनिवासन हे सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बिझी होते. त्यामुळे उद्धव ठाकरे तिथे आले तेव्हा ते पोहोचू शकलेले नाहीत. पण या गोष्टीवरुन वेगवेगळे तर्कवितर्क लढवले गेले. श्रीनिवासन यांना मुद्दामून बैठकीत व्यस्त ठेवलं आहे का? त्यांना स्मारकस्थळी जाण्याच्या सूचना नाहीत का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे स्मारकाचं बांधकाम सुरु असल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना स्मारकाच्या बांधकामाविषयी माहिती दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम किती युद्ध पातळीवर सुरु आहे, याबाबत टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना माहिती दिली. या दरम्यान एमएमआरडीएचे चेअरमन श्रीनिवासन हे देखील तिथे आले.

श्रीनिवासन हे सह्याद्री अतिथीगृहावर शासकीय कामकाजांवर बिझी होते. या दरम्यान त्यांना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी श्रीनिवासन यांना फोन करुन उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या बांधकमाची पाहणी करण्यासाठी आले असल्याची माहिती दिली. मिलिंद नार्वेकर यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर श्रीनिवासन तातडीने आपल्या शासकीय कामकाजांमधून वेळ काढून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकस्थळी पोहोचले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.