आमदार संदीप नाईकांची ‘रेंज रोव्हर’ शिवसैनिकांनी फोडली!
नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांचे लहान भाऊ आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोव्हर या अलिशान गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. संदीप नाईक हे ऐरोलीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक वादातून हा हल्ला झाला. ऐरोलीमध्ये महानगरपालिकेचं सभागृह बांधण्यात आलं आहे. या सभागृहाच्या […]
नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांचे लहान भाऊ आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोव्हर या अलिशान गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. संदीप नाईक हे ऐरोलीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक वादातून हा हल्ला झाला.
ऐरोलीमध्ये महानगरपालिकेचं सभागृह बांधण्यात आलं आहे. या सभागृहाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला स्थानिक शिवसेना नगरसेवकाला आमंत्रित करणं आवश्यक होतं. मात्र, संजीव नाईक यांनी स्थानिक शिवसेना नगरसेवकाला आमंत्रण दिलं नाही, असा आरोप शिवसैनिकांनी केला.
महानगरपालिका सभागृहाचे उद्घाटन करताना स्थानिक शिवसेना नगरसेवकाला न बोलावल्याने शिवसैनिक संतापले. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी थेट आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोव्हर या महागड्या गाडीवर हल्ला केला. गाडीच्या काचा फोडल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
या हल्ल्यात सुदैवाने राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांना दुखापत झाली नाही.
कोण आहेत संदीप नाईक?
ऐरोलीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले संदीप नाईक हे माजी मंत्री आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे सुपुत्र आहेत. माजी खासदार संजीव नाईक हे त्यांचे मोठे बंधू होय.
2009 आणि 2014 अशा सलग दोनवेला संदीप नाईक नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले आहेत.