काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा शिवसेना-राष्ट्रवादीचा डाव; काँग्रेस नेत्याचं थेट सोनिया गांधींना पत्रं

शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यातील काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत सुरू आहे, अशी तक्रार मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू राय यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. (shivsena and ncp are trying to vanish congress in maharashtra)

काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा शिवसेना-राष्ट्रवादीचा डाव; काँग्रेस नेत्याचं थेट सोनिया गांधींना पत्रं
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 1:31 PM

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून काँग्रेसकडे दुर्लक्ष केलं जात असून शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यातील काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत सुरू आहे, अशी तक्रार मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू राय यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. विश्वबंधू राय हे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचे निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं. (shivsena and ncp are trying to vanish congress in maharashtra)

विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून सात मुद्द्यांवर हायकमांडचं लक्ष वेधलं आहे. त्यात शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसचं होत असलेल्या खच्चीकरणावरही भर दिला आहे. राय यांच्या या पत्रामुळे आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम स्थान मिळत असल्याचा रोखच या पत्राचा असल्याने काँग्रेस नेत्यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्हं निर्माण होत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. दरम्यान, या पत्रावरून काँग्रेसमधून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हे आहेत सात मुद्दे

>> महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पण या वर्षभरात केवळ मित्र पक्ष म्हणूनच काँग्रेसचं महाआघाडीत स्थान राहिलं आहे.

>> केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच राज्य सरकार चालवत असल्याचं चित्रं आहे. एनसीपी सातत्याने काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

>> काँग्रेसचे मंत्री संघटनेच्या काहीच उपयोगी पडताना दिसत नाहीत. सामान्य जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांना तर काँग्रेसच्या मंत्र्यांची खातीच माहिती नाही.

>> आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले तरी महामंडळं आणि आयोगांवरील नियुक्या अद्याप करणअयात आलेल्या नाहीत.

>> काँग्रेसचं नुकसान करण्यावर आणि स्वत:चा पक्ष बळकट करण्यावर मित्र पक्षांनी जोर दिला आहे. मित्र पक्षांचा हा डाव रोखण्यात काँग्रेसला अपयश येत आहे.

>> 2019मध्ये पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्ती झालेली नाही. सरकारला एक वर्ष पूर्ण झालं तरी आमचीही आश्वासने अद्यापही तशीच आहेत.

>> काँग्रेसची व्होटबँक स्वत:कडे खेचण्यावर मित्र पक्षांनी भर दिला असून त्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. पक्षातून होणारी गळती रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची गरज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला आघाडीच्या धर्माची आठवण करून देण्याची गरज आहे. (shivsena and ncp are trying to vanish congress in maharashtra)

संबंधित बातम्या:

जिथे ताकद तिथे स्वबळ वापरु, राष्ट्रवादीची पहिल्यांदाच जाहीर भूमिका

शिवसेनेचं बोट धरुन विधानसभेत आल्याचा सतेज पाटील यांना विसर, ‘स्वबळा’च्या आरोपांनंतर राजेश क्षीरसागर भडकले

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, तीन नगरसेवक हाती बांधणार शिवबंधन

(shivsena and ncp are trying to vanish congress in maharashtra)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.