शिवसेनेची पालिकेसाठी मोर्चेबांधणी; राष्ट्रवादीतून आलेल्या संजय दिना पाटलांवर मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी दिली आहे. (shivsena appointed sanjay dina patil as Mumbai North East constituency coordinator)

शिवसेनेची पालिकेसाठी मोर्चेबांधणी; राष्ट्रवादीतून आलेल्या संजय दिना पाटलांवर मोठी जबाबदारी
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 10:41 AM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली असून संजय दिना पाटील यांना ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (shivsena appointed sanjay dina patil as Mumbai North East constituency coordinator)

गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी संजय पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार राहिलेल्या संजय पाटील यांच्याकडे वर्षभरापासून कोणतीच जबाबदारी देण्यात आली नव्हती. मात्र, आता पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय पाटील यांच्याकडे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याशिवाय मनसेतून शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक संजय भालेराव यांचंही पक्षात पुनर्वसन करण्यात आलं आहे. भालेराव यांच्याकडे घाटकोपर (पश्चिम) विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय भालेराव यांच्या पत्नी आणि विद्यमान नगरसेविका अर्चना भालेराव यांनीही मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला आहे. ऑक्टोबर 2017मध्ये मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यात अर्चना भालेराव यांचाही समावेश होता. महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर कडवं आव्हान असणार आहे. बदलेल्या राजकीय समीकरणामुळे शिवसेनेला फायदा होणार असला तरी आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी आणि महापौरपद आपल्याकडेच राहावं म्हणून शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इतर पक्षातून आलेल्यांना बळ देऊन राजकीय गणितं मांडण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय पाटील आणि संजय भालेराव यांच्याकडे मोठी जबाबदारी देऊन शिवसेनेने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. (shivsena appointed sanjay dina patil as Mumbai North East constituency coordinator)

संबंधित बातम्या:

LIVE | औरंगाबादचे नामकरण राजकारणाचा नव्हे अस्मितेचा विषय : संजय राऊत

अभिनेते महेश मांजरेकर यांच्यावर मारहाणीचा आरोप, अदखलपात्र गुन्हा दाखल

‘औरंगजेब कुणाला प्रिय?’ रोखठोकमधून काँग्रेसच्या ‘सेक्युलर’वादावर राऊतांचा निशाणा

(shivsena appointed sanjay dina patil as Mumbai North East constituency coordinator)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.