कुणी तरी काढा दिल्याने तुमचा आवाज विरोधात, आंदोलन कुणाच्या विरोधात आहे?; अरविंद सावंतांचा संभाजीराजेंना सवाल

खासदार संभाजी छत्रपती यांनी येत्या 16 जून रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. (shivsena leader arvind sawant raise question on sambhaji chhatrapati's maratha morcha )

कुणी तरी काढा दिल्याने तुमचा आवाज विरोधात, आंदोलन कुणाच्या विरोधात आहे?; अरविंद सावंतांचा संभाजीराजेंना सवाल
अरविंद सावंत, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 4:05 PM

मुंबई: खासदार संभाजी छत्रपती यांनी येत्या 16 जून रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मात्र त्यावर सवाल केला आहे. आंदोलन कुणाच्या विरोधात आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आहे का?; असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे. शिवसेनेच्या बड्या नेत्याने पहिल्यांदाच थेट संभाजीराजेंनाच सवाल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (shivsena leader arvind sawant raise question on sambhaji chhatrapati’s maratha morcha )

संभाजी छत्रपती यांनी आज किल्ले रायगडावरून येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याची हाक दिली. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीराजे भाजपचे खासदार आहेत. कोणाविरुद्ध लढतो? कशासाठी लढतोय? हे त्यांनी ठरवलं पाहिजे. सरकार तुमच्याबरोबर आहे. न्यायिक लढाई लढण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. कोणीतरी काढा दिल्यानंतर तुमचा आवाज विरोधात दिसत आहे, असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

आंदोलनाला भाजपचा पाठिंबा?

संभाजीराजेंचा आम्ही आदर करतो. भाजपचा या आंदोलनाला छुपा पाठिंबा असू शकतो. राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे हे आंदोलन केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय की सरकार विरोधात आहे? हे संभाजीराजेंनी स्पष्ट केलं पाहिजे, असं ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांना टार्गेट करणे हास्यास्पद

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना भाजपकडून टार्गेट केलं जात आहे. त्यावरूनही त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. आदित्य ठाकरे यांना टार्गेट करणे हास्यास्पद आहे. सबंध पर्यावरण चळवळीचे प्रणेते आदित्य ठाकरे हे मंत्री नव्हते, तेव्हा त्यांनी सागरी किनारा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे राज्य सरकारला प्लास्टिक बंदीचा कायदा करावा लागला. ठाकरे घराणं निसर्गप्रेमी आहे. ज्यांनी अंधाऱ्या रात्री गोरेगावात झाडांच्या कत्तली केल्या त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे?, असा सवालही त्यांनी केला. (shivsena leader arvind sawant raise question on sambhaji chhatrapati’s maratha morcha )

संबंधित बातम्या:

खासदार संभाजी छत्रपतींची रायगडावर घोषणा, पहिला मराठा मोर्चा 16 जूनला; ठिकाणही ठरलं

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची पेट्रोल पंपावर निदर्शने; सोमवारी 1 हजार ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन

स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मोठा साठा उपलब्ध होणार : राजेश टोपे

(shivsena leader arvind sawant raise question on sambhaji chhatrapati’s maratha morcha )

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.