Sanjay Raut: महाराष्ट्र हा गांXची औलाद नाही, तुमच्या नामर्दानगीला घाबरणार नाही; राऊत गर्जले

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात आज पत्रकार परिषद घेऊन हा धमाका केला. राऊत यांनी कालच शिवसेनेची पत्रकार परिषद होणार असून त्यात भाजपच्या साडेतीन लोकांची पोलखोल करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे राऊत काय पोलखोल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

Sanjay Raut: महाराष्ट्र हा गांXची औलाद नाही, तुमच्या नामर्दानगीला घाबरणार नाही; राऊत गर्जले
रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है, बाप काय असतो हे दाखवूच; राऊतांनी भाजपला ललकारले
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 1:14 PM

मुंबई: महाराष्ट्र (maharashtra) आणि मराठी माणसाविरोधात जे आक्रमण सुरू आहे. त्याविरोधात कोणी तरी रणशिंग फुंकायला हवं होतं. ते शिवसेना भवनातून (shivsena bhavan) आम्ही फुंकत आहोत. तू काही पाप केलं नसेल, काही गुन्हा केला नसेतल तर कुणाच्या बापाला घाबरू नको, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सागंत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्याच पद्धतीने शिवसेना पुढे नेत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र हा गांXची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. तुम्ही कितीही नामर्दानगी करून वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही, हा संदेश देण्यासाठीच ही पत्रकार परिषद आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना असेल, ठाकरे परिवार असेल, अडसूळ असतील, वायकर असतील, परब आणि भावना गवळी यांच्यासह पवार कुटुंबीयांवर तपास यंत्रणांनी हल्ले केले आहेत, असं राऊत म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात आज पत्रकार परिषद घेऊन हा धमाका केला. राऊत यांनी कालच शिवसेनेची पत्रकार परिषद होणार असून त्यात भाजपच्या साडेतीन लोकांची पोलखोल करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे राऊत काय पोलखोल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावेळी खासदार विनायक राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आदेश बांदेकर, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, विनोद घोसाळकर, आनंदराव अडसूळ, मंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, मिलिंद नार्वेकर, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सुनील राऊत, नगरसेविका राजूल पटेल आदी शिवसेना नेते उपस्थित होते.

त्यांना सरकार घालवायचंय

महाराष्ट्रासह पश्चिम बंगालवर संकट आलं. महाराष्ट्रातील सरकार त्यांना घालवायचं आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा वापर सुरू आहे. खोटे आरोप आणि दबाव सुरू आहे. सरेंडर व्हा. गुडघे टेका नाही तर सरकार घालवू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. भाजपचे लोक का तारखा देत आहेत. 170चं बहुमत असताना भाजपला हे सरकार पाडायचं आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

डरेंगे नही, झुकेंगे नहीं

ईडीच्या या कारवायांपुढे आम्ही झुकणार नाहीत, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. ते म्हणाले, ईडीवाले कुणालाही धमकावतात. चौकशीसाठी घेऊन जातात. पण आधी म्हटल्याप्रमाणं हे शिवसेना भवन आहे. साहेबांची प्रेरणा आमच्या मागे आहे. आम्ही आधीही म्हटलं होतं. आता पुन्हा सांगतो. डरेंगे नहीं, झुकेंगे नाही…. महाराष्ट्रात ठाकरे सरकारच राहणार.. तेव्हा हे घाबरवणारे कुठे असतील, ते बघून घेऊ, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

आप आगे बढो, पुढे व्हा

मला असं वाटतं ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे. बाळासाहेबांचं वंदन करतो आणि त्यांचं स्मरण करतो. या वास्तुला एक महत्त्व आहे. अनेक लढे शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वात याच वास्तुतून केलं. या वास्तुने अनेक हल्ले पचवले आहे. अतिरेक्यांचा हल्लाही पचवला. याच वास्तुच्या खाली अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट केले आहेत. ज्यांनी वर्षांनुवर्ष ज्यांनी शिवसेनाप्रमुख यांच्यासोबत काम केलं ते सर्व आहेत. थोड्यावेळापूर्वी मला शरद पवारांचा फोन होता. महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांचे फोन सुरू आहेत. सर्वांनी पत्रकार परिषदेला आशीर्वाद दिले आहेत. आप आगे बढो, पुढे व्हा, लढाईची सुरुवात तुम्ही करा, असं त्यांनी सांगितलं, असंही त्यांनी सांगितलं.

भव्य स्वागत आणि घोषणा

संजय राऊत दुपारी दैनिक ‘सामाना’च्या कार्यालयातून निघाले. त्यानंतर ते 3.35 वाजता शिवसेना भवनात दाखल झाले. राऊत गळ्यात भगवा शेला घालून आले होते. राऊत यांची गाडी येताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी केली. ‘कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…’, ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘मुंबई आमच्या बापाची, नाही कुणाच्या हक्काची’ आदी घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. भाजप चिरीमिरी आहे. कुठे फाडून फेकू कळणार नाही, अशा घोषणाही शिवसैनिकांनी दिल्या. त्यानंतर राऊत यांनी गाडीतून उतरून हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन करताच एकच जल्लोष झाला. यावेळी शिवसेना भवनाबाहेर हजारो शिवसैनिक जमले होते. तसेच या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. भाजप वैयक्तिक राजकारण करत आहे. त्यांना सडेतोड उत्तर दिलच पाहिजे. महापालिकेच्या निवडणुकीत काय होईल हे कळेलच, असा इशारा शिवसेनेच्या रणगाणिंनी दिला.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut Press Conference LIVE : संजय राऊतांची वादळी पत्रकार परिषद, कुणावर बाण, कुणाशी सामना?

शिवसेनेने तोफ डागण्यापूर्वीच चंद्रकांत पाटील आणि सोमय्या दिल्लीकडे रवाना; राजकीय घडामोडींना प्रचंड वेग

Maharashtra News Live Update : सिंधुदुर्गात भाजपात मोठी दुफळी, निवडणुकीनंतर मोठा झटका

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.