महाराष्ट्र बंदला विरोध म्हणजे शेतकरी चिरडण्याला पाठिंबा; भाजप, मनसे संजय राऊतांच्या निशाण्यावर

बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेच्या नेत्यांनी केला. मात्र, या बंदमध्ये विरोधी पक्ष भाजप तसेच मनसेने सहभाग नोंदवला नाही. याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली.

महाराष्ट्र बंदला विरोध म्हणजे शेतकरी चिरडण्याला पाठिंबा; भाजप, मनसे संजय राऊतांच्या निशाण्यावर
sanjay raut
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 6:30 PM

मुंबई : लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज (11 ऑक्टोबर) महाविकास आघाडीतर्फे बंद पाळण्यात आला. हा बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेच्या नेत्यांनी केला. मात्र, या बंदमध्ये विरोधी पक्ष भाजप तसेच मनसेने सहभाग नोंदवला नाही. याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली. महाराष्ट्र बंदमध्ये सामील न होणे म्हणजेच शेतकरी चिरडण्याला पाठिंबा देणे आहे, असे म्हणत राऊतांनी भाजप तसेच मनसेवर निशाणा साधला. ते मुंबईत ट्विव्ही 9 मराठीशी बोलत होते.

…म्हणजेच शेतकऱ्यांना चिरडून मारलं त्याला पाठिंबा

राज्यात आज सर्व जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. मात्र या बंदला भाजप तसेच मनसेने पाठिंबा दिला नाही. यावर बोलताना राऊत यांनी दोन्ही पक्षांवर घणाघाती टीका केली. “भाजप तसेच मनसे या बंदमध्ये सहभागी झालेले नाहीत. याचाच अर्थ त्यांनी शेतकऱ्यांना ज्या प्रकार चिरडून मारलं त्या घटनेला पाठिंबा दिला आहे,” असे राऊत म्हणाले.

आंदोलने होतात तेव्हा ठिणग्या उडतात 

तसेच बंददरम्यान, ठाण्यासारख्या ठिकाणी बंदला गालबोटल लागले. काही ठिकाणी टायर जाळण्यात आले. रिक्षाचालकांना मारण्यात आले. काही ठिकाणी बस फोडल्याच्या घटना घडल्या. या मुद्द्याला घेऊन विरोधकांनी टीका केली. यावर बोलताना “विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जरूर आरोप करावेत. लोकशाहीत आरोप करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांचंही केंद्रात सरकार आहे. पण अशाप्रकारे आंदोलने होतात, तेव्हा अशा ठिणग्या उडत असतात. अशा घटना सर्वत्र घडत असतात. हरियाणा, दिल्ली येथेसुद्धा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे काही आरोप करत आहेत त्यामध्ये काय तथ्य आहे, याविषयी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे लोक बोलू शकतील. पण पोलिसांनी या सर्व गोष्टीला पाठिंबा दिला, असं म्हणणं म्हणजे पोलीस खात्याचं खच्चीकरण करण्यासारखं आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

मंत्री राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत

लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ बंद पाळला जातोय. मात्र, महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही भाजपने केला आहे. भाजपचे हे आरोपदेखील राऊत यांनी फेटाळून लावले. “महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा तडाखा बसला आहे. ते सातत्याने होत आहे. मी सरकारतर्फे नाही. मी सरकारचा सदस्य नाही. पण माझ्या माहितीनुसार औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई हे त्या भागात शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत होते,” असे राऊत म्हणाले. विरोधकांच्या आरोपांत तथ्य नसल्याचे राऊत यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

इतर बातम्या :

मुंबईत अडीच, नागपुरात 8 तास, अनिल देशमुख यांच्या दोन शहरातील घरावर सीबीआयची धाड, तपासात काय सापडलं ?

रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट, बंद पाळून नागरिकांची भाजपला सणसणीत चपराक : नाना पटोले

‘आघाडी सरकारला लखीमपूरच्या शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम, लातूरच्या आंदोलक शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष’

(shivsena leader sanjay raut criticizes mns and bjp on maharashtra bandh support for lakhimpur kheri violence)

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.