विरोधकांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं; महाराष्ट्रातही तसंच होईल: संजय राऊत
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. (shivsena leader sanjay raut slams bjp)

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोधक होते. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं. महाराष्ट्रातही तसंच होईल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. (shivsena leader sanjay raut slams bjp)
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. न्याय कसा असावा हे सैन्याला शिवाजी महाराजांनी सांगितलं. आज शेतकऱ्यांच्या पोटाला, देठाला, अस्तित्वाला धक्का लागतोय, ही परिस्थिती विकट आहे, असं राऊत म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री याचा अभिमान
शिवाजी महाराजांचा उत्सव हा देशात साजरा होतोय. शिवाजी महाराजांकडून संपूर्ण देश खरी प्रेरणा घेतोय. आपण त्यांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणतो. निश्चयाचा महामेरू म्हणतो, महाराष्ट्राला इतिहास आहे, इतरांना भूगोल असेल… अशा शिवाजींचा जन्म इथे झाला हे महत्वाचं… ज्या शिवाजींच्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब, असंही ते म्हणाले.
घराघरात, मनामनात शिवजयंती साजरी होऊ दे
कोरोना नियमांचे पालन करुन शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. “महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँ साहेबांसमोर आज शिवजयंतीदिनी पुन्हा एकदा नतमस्तक होतो असं सांगत अजित पवार यांनी शिवरायांना मानाचा मुजरा करत त्रिवार वंदन केले.
ही शौर्य आणि त्यागाची जयंती
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे असेही ते म्हणाले. स्वराज्यातील मावळ्यांच्या शौर्याला, त्यागाला, राष्ट्रभक्तीला वंदन करताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावात महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत, हे या भूमीचं, आपल्या सर्वांचं भाग्य आहे, असंही त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्राच्या युवा शक्तीला, आधुनिक मावळ्यांना वंदन करतानाच महाराष्ट्रातल्या तमाम बंधु-भगिंनीना, जगभरातल्या शिवभक्तांना शिवजयंतीच्या अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (shivsena leader sanjay raut slams bjp)
LIVE : महाराष्ट्रातील घडामोडींचे महत्त्वाचे अपडेट्सhttps://t.co/lPvgQs2Psb#Maharashtra #LiveUpdates #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 19, 2021
संबंधित बातम्या:
किल्ले शिवनेरीवर संचारबंदी, मात्र गडाच्या पायथ्याशी शिवभक्तांचा उत्साह कायम
शिवजयंतीवर बंधनं घालायला ही काय मोगलाई आहे काय?; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
शशिकांत शिंदेंसोबत दिलजमाईचे संकेत, शिवेंद्रराजेंचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’?
(shivsena leader sanjay raut slams bjp)