अंधारेबाई म्हणाल्या की मला आमिष दिलं,धमकावलं तेवढी लायकी तरी आहे का तिची? ; शिवसेनेच्या नेत्याने अंधारेंची लायकी का काढली…

बारसू प्रकल्पावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांना त्यावरून म्हणाले की, आधी पत्र लिहून समर्थन करता, नंतर प्रकल्पाला विरोध करता ही तुमची दुटप्पी भूमिका असल्याचा टोमणाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

अंधारेबाई म्हणाल्या की मला आमिष दिलं,धमकावलं तेवढी लायकी तरी आहे का तिची? ; शिवसेनेच्या नेत्याने अंधारेंची लायकी का काढली...
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 4:55 PM

मुंबई : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिवसेनेचे नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदारपणे जुंपली आहे. सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या झाल्यापासून शिवसेनेच्या नेत्यांकडून अंधारे यांच्यावर अगदी पातळी सोडून टीका करण्यात आली आहे. त्यांच्या या टीकेला सुषमा अंधारे यांनी तेवढ्याच जोरदारपणे प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर आता पुन्हा एकद सुषमा अंधारे आणि शिवसेनेचा वाद शिगेला पोहचला आहे. आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना त्यांची लायकी काढत, त्यांनी जर न्यायालयीन लढा देण्याचा इशारा दिला असेल तर मीही त्यासाठी तयार असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

त्यामुळे भविष्यात जर अंधारे आणि शिवसेनेचा वाद न्यायालयात गेला तर मात्र हा वाद चिघळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना त्यांनी अगदी पातळी सोडून त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनीही संजय शिरसाट यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनी त्यांना कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा दिला होता. त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, अशा दाव्यांना मी घाबरत नाही आणि त्यांनी जर कायदेशीर लढाईचा इशारा देत असतील तर मीही कायदेशीर लढाई लढणार असं स्पष्टपणे त्यांनी त्यांना सुनावलं आहे.

ज्या बाईने संतांचा अपमान केला, बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला, उद्धव ठाकरे यांचा अपमान केला. वारीला जाणाऱ्या महिला गरोदर राहतात म्हणाली ती आता माझ्याविरोधात दावा करतेय. का अशा एकेरी शब्दात त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

एका मुलाखती दरम्याने अंधारेबाई म्हणाल्या की, मला आमिष दिलं, धमकावलं तेवढी लायकी तरी आहे का तिची अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर जोरदा टीका केली आहे.

सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांना कायदेशीर लढाईचा इशारा दिल्यानंतर बिनपैश्याचे 47 वकील तिची केस आता लढणार आहेत. मीही कोर्टात ही लढाई लढेन अशा लढाईला मी घाबरत नाही असंही त्यांनी स्पष्टपणे त्यांनी बोलून दाखवले आहे.

यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करता करता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाण साधला उद्धव ठाकरे यांच्याकडे आता तेच तेच डायलॉग आहेत. त्यामुळे लोकंही या डायलॉग्सना कंटाळली आहेत अशी टोलेबाजीही त्यांनी त्यांना केली आहे.

तर बारसू प्रकल्पावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांना त्यावरून म्हणाले की, आधी पत्र लिहून समर्थन करता, नंतर प्रकल्पाला विरोध करता ही तुमची दुटप्पी भूमिका असल्याचा टोमणाही त्यांनी त्यांना लगावला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कमी आहे कार्यकर्ता म्हणून जास्त वावरतात.

त्यामुळे त्यांच्या स्वभावामुळे आजूबाजूला डोमकावळे बसलेत त्यासाठी राज ठाकरे तसे म्हणाले असतील असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.