आदित्य ठाकरेंसाठी ‘वरळी’ सोडली, शिवसेनेकडून सुनील शिंदेना विधान परिषदेची उमेदवारी?

शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेकडून विधान परिषदेचं तिकीट देणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.

आदित्य ठाकरेंसाठी 'वरळी' सोडली, शिवसेनेकडून सुनील शिंदेना विधान परिषदेची उमेदवारी?
shivsena leader Sunil Shinde
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 5:08 PM

मुंबई: शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेकडून विधान परिषदेचं तिकीट देणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुनील शिंदे यांनी वरळीची जागा सोडली होती. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांचं विधान परिषदेत पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई यांची नावे चर्चेत होती. मात्र, या जागेसाठी सुनील शिंदे यांचं नाव शिवसेनेतून फिक्स झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्याला शिवसेनेतून अद्याप कुणी दुजोरा दिलेला नाही.

संघटनात्मक कामात व्यस्त

सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना उभं करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सुनील शिंदे यांनी आदित्य यांच्यासाठी वरळीची जागा सोडली होती. त्यानंतर शिंदे यांनी संघटनात्मक कामात स्वत:ला झोकून दिलं होतं. या पार्श्वभूमीवर शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं शिवसेनेत घटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कोण आहेत सुनील शिंदे?

शिवसैनिक ते आमदार असा सुनील शिंदे यांचा प्रवास राहिला आहे. 2007मध्ये ते मुंबई महापालिकेत निवडून आले होते. बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. 2014 मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करुन विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना या निवडणुकीत 60 हजार 625 मतं मिळाली होती. तर सचिन अहिर यांना 37613 मतं मिळाली होती. 2015मध्ये त्यांच्याकडे उत्तर अमहदनगर संपर्क प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

कदमांना तिकीट नाहीच

दरम्यान, शिवसेना नेते रामदास कदम यांना विधान परिषदेवर न पाठवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचं सांगितलं जातं. रामदास कदम यांची मध्यंतरी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पुरावे दिल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर कदम यांचा विधानपरिषदेतून पत्ता कट करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच शिवसेनेतून तरुण नेत्याला विधान परिषदेवर संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या:

पवारांना जेलमध्ये गेलेल्या देशमुखांचे दुःख, परबांना अहंकार; ST आंदोलनात लढाई सुरू झाल्याचा दरेकरांचा इशारा

VIDEO : Sharad Pawar | सरकारला झुकवणाऱ्या शेतकऱ्यांना सलाम करतो – शरद पवार

शेतकरी उत्पादक कंपन्यांचा असा ‘हा’ फायदा, शेतीमालाची विक्री अन् मोबदला एकाच जागी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.