मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी यामिनी जाधव यांचे सगळे पैसे युएईला गेले असल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेनेत आणि राज्यात खळबळ उडाली होती. यामिनी जाधव यांच्यावर किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या खात्यातून 2 कोटींचे व्यवहार झाले होते असा गंभीर आरोप केला होता. त्याआधी यामिनी जाधव म्हणजे शिवसेनेच्या रणरागिणी, कट्टर शिवसैनिक, आक्रमक नेत्या आणि अभ्यासू नगरसेविका अशी त्यांची ओळख होती. त्यानंतर त्या शिवसेनेतून त्या भायखळ्यातून आमदार झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.
मात्र ठाकरे कुटुंबांशी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेल्या यामिनी जाधव यांनी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या सुरतला निघून गेल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
त्यावेळी ज्या प्रमाणे बंडखोरी केल्यानंतर चर्चेत आल्या होत्या, त्याच प्रमाणे उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे आताही त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
यामिनी जाधव म्हणजे भायखळ्याच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेविरोधात त्यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. यामिनी जाधव यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या या बंडावर अनेकांनी सवाल उपस्थित केले होते.
त्यानंतर त्यांनी सांगितले होते, की, आपल्या पडत्या काळात कोणत्याही वरिष्ठ नेत्याने साधी विचारपूस केली नव्हती. कॅन्सर झाल्यानंतरही कुणीही विचारपूस केली नाही. त्या गोष्टीचा मला प्रचंड त्रास झाला होता असं सांगत त्यांनी आपल्या बंडाचे समर्थन केले होते.
शिवसेनेच्या आक्रमक महिल नेत्या अशी यामिनी जाधव यांची ओळख आहे. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे दांपत्य शिवसेनेत सक्रिय आहेत.
त्यामुळे सामान्य शिवसैनिक ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला. त्या उच्च शिक्षित असून गेल्या अनेक वर्षांपासून त्या शिवसेनेत सक्रिय आहेत.
यामिनी जाधव 2012 मध्ये नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना शिवसेनेने भायखळ्यातून आमदारकीचे तिकीट जाहीर केले होते.
2019 मध्ये त्या एमआयएमच्या वारिस पठाण यांना पराभूत करून विजयी झाल्या. विशेष म्हणजे पठाण हे स्थानिक आमदार होते. तर यामिनी जाधव या पहिल्यांदाच विधानसभेला उभ्या होत्या. तसेच हा संपूर्ण परिसर मुस्लिम बहुल असतानाही त्या विजयी झाल्या होत्या.
यामिनी जाधव यांनी नगरसेविका म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या प्रभागावर प्रचंड प्रभाव पाडल होता. त्यामुळे मधल्याकाळात त्यांचे नाव महापौरपदासाठी चर्चेत आलं होतं.
त्यावेळी महापौरपद अनुसुचित जातीसाठी राखीव झालं होतं. त्यामुळे या पदासाठी स्नेहल आंबेकर, भारती बावधान आणि यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिवसेनेने महापौरपदाची सूत्रे स्नेहल आंबेकरांकडे यांच्याकडे दिली होती.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
त्यानंतर आयटीकडून यशवंत जाधव यांना नोटीसही बजावण्यात आली होती. तर काही दिवसांनी यामिनी जाधव यांच्या घरावर आयटीकडून छापा टाकण्यात आला.
त्यावेळी यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा यामिनी जाधव चर्चेत आले आहेत.
कारण उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार असल्याने 15 आमदारांच्या त्या निकालाकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.