Sanjay Raut : ‘त्या’ व्हिडीओमध्ये आर्यन कुणाशी बोलतोय? संजय राऊतांकडून खळबळजनक व्हिडीओ शेअर

मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज सापडल्या प्रकरणी आर्यन खान सह आठ जणांना एनसीबीनं ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अटक केली होती. तेव्हा पासून हे प्रकरण सातत्यानं चर्चेत आहे.

Sanjay Raut : 'त्या' व्हिडीओमध्ये आर्यन कुणाशी बोलतोय? संजय राऊतांकडून खळबळजनक व्हिडीओ शेअर
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 2:35 PM

मुंबई: मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज सापडल्या प्रकरणी आर्यन खान सह आठ जणांना एनसीबीनं ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अटक केली होती. तेव्हा पासून हे प्रकरण सातत्यानं चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर आरोपसत्र सुरु केलं होतं. एनसीबीचा आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यानं धक्कादायक आरोप केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करुन चौकशीची मागणी केलीय. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“आर्यन खानच्या केसमधील साक्षीदाराला कोऱ्या कागदावर एनसीबीनं स्वाक्षऱ्या करायला लावल्या, सही करायली लावली हे धक्कादायक आहे.पैशाची मागणी केल्याचेही काही रिपोर्टस आहेत असं समजलं.मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेले की ह्या केसेस या माहारष्ट्राला बदनाम करण्यासाठी आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि महाराष्ट्र पोलिसांनी याची स्वत:हून दखल घेत चौकशी करावी”, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत आर्यन खान के.पी.गोसावीच्या फोनवरुन कुणाशी बोलतोय हा प्रश्न निर्माण झालाय.

प्रभाकर साळीचे नेमके आरोप काय?

आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटींची डील झाली होती. त्यापैकी 8 कोटी समीर वानखेडेंना मिळणार होते, के.पी गोसावी, सॅम, पूजा दादलानीमध्ये डील होणार होती, असा दावा प्रभाकर साईल यांनं केला आहे. 50 लाख के.पी गोसावीसाठी एका व्यक्तीकडून घेतले होते. 38 लाख सॅम यांना दिले होते, तर माझ्याकडून एनसीबीने 9 कागदांवर सह्या घेतल्या असा आरोप प्रभाकर साईल यांनी केला. माझ्या जीवाला समीर वानखेडेंकडून धोका असल्याचा आरोप देखील प्रभाकर साईल यानं केला आहे.

प्रभाकर साईल कोण?

प्रभाकर साईल हा के.पी गोसावीचा बॉडीगार्ड आहे. आर्यन खान प्रकरणात किरण गोसावी सह प्रभाकर साळी याचं नाव देखील साक्षीदार म्हणून एनसीबीकडून सांगण्यात आलं आहे. 12 जुलैपासून प्रभाकर साईल गोसावीचा बॉडीगार्ड आहे.

इतर बातम्या:

Exclusive : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात ट्विस्ट, NCB नं कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, पंचाचा दावा

VIDEO : Nawab Malik | सत्य ही जीतेगा सत्यमेव जयते, नवाब मलिक यांचं ट्विट

Shivsena Sanjay Raut share video related Aryan Khan Mumbai Drug Case demanded Suo Moto Cognizance by Maharashtra Police and Home Minister Dilip Walase Patil

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.