देगलूरमध्ये चारीमुंड्या चीत, बंगालमध्ये तृणमूलने उखडून फेकलं, दादरामध्ये भगवा फडकला, भाजपचं अध:पतन : राऊत

देगलूरमध्ये भाजप चारीमुंड्या चीत झालं, बंगालमध्ये तृणमूलने भाजपला उखडून फेकलं तर दादरामध्ये भाजप उमेदवाराला पराभूत करुन सेनेने भगवा फडकला, भाजपच्या या अध:पतन स्वत: भाजप जबाबदार आहे, अशी टोलेबाजी राऊतांनी अग्रलेखातून केली आहे.

देगलूरमध्ये चारीमुंड्या चीत, बंगालमध्ये तृणमूलने उखडून फेकलं, दादरामध्ये भगवा फडकला, भाजपचं अध:पतन : राऊत
sanjay raut
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 7:56 AM

मुंबई : देशासह महाराष्ट्रात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला. निवडणूक निकालाने भाजपला बॅटफूटवर जावं लागलंय. आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊतांनी जोरदार बॅटिंग करत भाजपच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे. देगलूरमध्ये भाजप चारीमुंड्या चीत झालं, बंगालमध्ये तृणमूलने भाजपला उखडून फेकलं तर दादरामध्ये भाजप उमेदवाराला पराभूत करुन सेनेने भगवा फडकला, भाजपच्या या अध:पतन स्वत: भाजप जबाबदार आहे, अशी टोलेबाजी राऊतांनी अग्रलेखातून केली आहे.

दादरा नगर हवेलीचा विजय हुकूमशाही प्रवृत्तीस दे धक्का

दादरा-नगर हवेलीचा विकास व भयमुक्त प्रदेश या धोरणानेच शिवसेना तेथे काम करील. शिवसेना शब्दाला, वचनाला जागणारा पक्ष आहे याची प्रचीती डेलकर कुटुंबास आणि दादरा-हवेलीच्या जनतेला आल्याशिवाय राहणार नाही. दादरा-नगर हवेलीचा विजय हा नुसता विजय नसून देशातील हुकूमशाही प्रवृत्तीस दे धक्का आहे. असे धक्के देशातील अनेक भागांत बसले आहेत.

देशभरातील पोटनिवडणुकांच्या निकालांत भाजपची पीछेहाट

देशभरातील पोटनिवडणुकांच्या निकालांत भाजपची पीछेहाट झाली आहे. प. बंगालमधील चारही जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या. तीन ठिकाणी भाजपला अनामत रक्कमही वाचवता आली नाही. तृणमूल काँग्रेसने प. बंगालातून भाजपला उखडून फेकले आहे. महाराष्ट्रातील नांदेडात देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीतूनही भाजपचे ‘आयात’ उमेदवार साबणे यांचा अति दारुण पराभव झाला. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी लाखावर मते मिळवून भाजपच्या आयात उमेदवारास चारीमुंड्या चीत केले.

भाजपच्या अध:पतनास भाजप जबाबदार

भाजपकडे निवडणुका लढविण्यासाठी स्वतःचे उमेदवार नाहीत. इकडून तिकडून उधार-उसनवारी करून ते जितमय्याचा आव आणतात, पण जनता शेवटी त्यांना आपटतेच, हे देगलुरात दिसले. भाजपकडे आता त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते फारसे उरले नसून यापुढे त्यांनी ईडी, सीबीआय, आयटी, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पकडून ‘कमळ’ चिन्हावर उभे केले पाहिजे, असे आता जागोजाग लोक चेष्टेने बोलू लागले असतील तर त्या अधःपतनास भाजप स्वतःच जबाबदार आहे.

हिमाचल प्रदेशात भाजपची वाताहात,

हिमाचल प्रदेशात भाजपची वाताहत झाली आहे. मंडी लोकसभा मतदारसंघासह तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसने भाजपचा पराभव केला. राजस्थानातही काँग्रेसने दोन जागा जिंकल्या. कर्नाटकातील निकालही भाजपसाठी चांगला नाही. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या हावेरी जिल्ह्यातील हंगल मतदारसंघातच काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेस दुबळी झाली की संपली असे बोलणाऱ्यांना हाताच्या पंजाने चपराक मारली आहे.

भाजपने दिवाळी साजरी करावी, असे निकाल लागलेले नाहीत

बिहारात नितीश कुमारांनी दोन्ही जागा जिंकल्या. आसामात भाजपने 5 जागा जिंकल्या. मध्य प्रदेशातही भाजपने जागा राखल्या हे खरे, पण तेरा राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीतील निकाल त्यांनी दिवाळी साजरी करून नाचावे, असे लागलेले नाहीत.

मोदी नावाचा जप करुन निवडणुका जिंकण्याचा काळ संपलाय

महागाईने लोकांच्या घरातील चुली विझल्या आहेत व लोकांनी महागाईविरोधात मतदान केले, असे हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले. याचा स्पष्ट अर्थ असा की, फक्त मोदी नामाचा जप करून निवडणुका जिंकण्याचा काळ संपला आहे. लोकांना भेडसावणारे प्रश्न निवडणुकांचे निकाल बदलतात. हिंदी पट्ट्यात भाजपविरोधी वातावरण आहे हेसुद्धा दिसते.

भाजपवाल्यांचं तुणतुणं, आता दादरातला सेनाचा विजय सत्यकथन करतो

महाराष्ट्रातील भाजपवाले एक तुणतुणे कायम वाजवत असतात, मोदींमुळे शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. त्यांच्यासाठी दादरा-नगर हवेलीचा शिवसेना विजय सत्यकथन करतोय. गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचे नाव न घेता, पोस्टरवर त्यांचे चित्र न लावता शिवसेना जिंकली व देगलुरला ‘मोदी मोदी’ करूनही भाजपला माती खावी लागली. दिवाळीचे फटाके फुटू लागले आहेत. कुणाला दिवाळीनंतर बॉम्ब फोडायचे असतील तर ते फोडावेत. त्या बॉम्बमध्ये दारू शिल्लक आहे काय तेवढेच एकदा बघा. नाही तर हसे व्हायचे.

दिवाळीचा सण आनंदाने, उत्साहाने साजरा करावा असा विजय महाराष्ट्राने मिळवला आहे. महाराष्ट्राच्या विजयाचे दमदार पाऊल देश पातळीवर पडले आहे. या पावलाखाली सर्व अमंगल, अन्याय चिरडून जाईल. महाराष्ट्र व जनतेची भरभराट होईल, हीच शुभेच्छा!

(Shivsena Sanjay Raut Slam BJP through Saamana Editorial Over bypoll Election)

संबंधित बातम्या :

देगलूर जिंकलं, दादरा नगर हवेलीत मोदींचं नाव न घेता भाजपला माती चारली, ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले : राऊत

शिवसेनेच्या वाघिणीचं जंगी स्वागत, रश्मी ठाकरेंकडून डेलकरांचं औक्षण, मातोश्रीचा खास पाहुणचार

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.