ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात दाखल होणार, संजय शिरसाट यांचे भाकीत खरे ठरणार

Shivsena Ravindra Waikar | मुंबई मनपाने रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी जमीन प्रकरणाचा पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली आहे. न्यायालयात मनपाने ही भूमिका मांडली आहे. यामुळे संजय शिरसाट यांचे भाकीत खरे ठरणार आहे.

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात दाखल होणार, संजय शिरसाट यांचे भाकीत खरे ठरणार
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 11:13 AM

मुंबई, दि. 23 फेब्रुवारी 2024 | उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील आमदार रवींद्र वायकर पक्षांतराच्या तयारीत आहे. लवकरच ते शिंदे गटात दाखल होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांना पाठबळ देण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या एका निर्णयामुळे मिळाले आहे. मुंबई मनपाने रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी जमीन प्रकरणाचा पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली आहे. न्यायालयात मनपाने ही भूमिका मांडली आहे.

जोगेश्वरी प्रकरणामुळे वायकर अडचणीत

जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे आमदार रवींद्र वायकर अडचणीत आले आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर रवींद्र वायकर यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा सुरू झाला. ईडीने या प्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. तसेच रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांची भेट घेऊन पक्ष तुमच्या पाठिशी असल्याचे सांगितले.

मुंबई मनपाने भूमिका बदलली

आता मुंबई मनपाने जोगेश्वरी भूखंड प्रकरणात भूमिका बदलली आहे. या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्याकडून पुनर्विचाराचा प्रस्ताव आला आहे. त्या प्रस्तावावर विचार करण्याची तयारी मुंबई मनपाने दाखवली आहे. जोगेश्वरी सुप्रीमो क्लब प्रकरणात परवानगी देताना जमीन घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. आता न्यायालयात रवींद्र वायकर यांच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची तयारी मनपाने दर्शवली आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी केले भाकीत खरे ठरण्याची चिन्ह आहे. संजय शिरसाट यांनी रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत म्हणाले होते वायकर यांच्यावर दबाब

आमदार रवींद्र वायकर यांना ईडीच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले होते. त्यात त्यांनी शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे. येत्या काही दिवसात शिवसेना सोडा. पक्षांतर करा. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे, असा दावा केला होता. परंतु वायकर कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.