मराठी माणसांची ताकद मिळाली, त्यामुळे मोदीजींना दिल्ली मिळाली…शिवसेनेमुळे भाजप वाढल्याची आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली…
uddhav thackeray Dasara Melava 2024: अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाया आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा. आम्हाला वाईट वाटतं एकेकाळचा आमचा मित्र पोखरला जातो. त्यांना सत्ता पाहिजे. कोणी चालेल पण सत्ता पाहिजे. याला म्हणतात सत्ता जिहाद.
महाराष्ट्रात भाजप काहीच नव्हती. परंतु भाजपला आम्ही सोबत घेऊन वाढवले. त्यामुळे त्यामुळे भाजपला दिल्लीत सत्ता मिळाली. शिवसेनाप्रमुखांनी दसऱ्या मेळाव्यात सांगितले होते सर्व भेदाभेद घालवून मराठी माणसाची एकजूट बांधा. जेव्हा मराठी माणसाची ताकद उभी राहिली नसती तर मोदीजी तुम्ही दिल्लीत दिसला नसता. ही मराठी माणसाची ताकद आहे, असे उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यात सांगितले.
थोतांड हिंदुत्व मान्य नाही…
एका तरुणाला गोरक्षकांनी मारलं. तो गोमांस घेऊन जाणार असल्याचा आरोप होता. पण तो आर्यन मिश्रा निघाला. म्हणून बातमी आली नाही. मग तो आर्यन खान, किंवा आर्यन शेख असता तर त्याचा किती आगडोंब झाला असता. किरण रिजीजू म्हणतात मी बीफ खातो. त्याचं काय करणार. मला हे थोतांड हिंदुत्व मान्य नाही. त्यामुळे मी त्यांच्याशी लढत आहे.
एकवेळा आरक्षण देऊ टाका…
मराठी लोकात भांडणं लावत आहे. याला आरक्षण देऊ त्याला आरक्षण देऊ म्हणून सांगता. तुमच्यात धमक असेल तर आरक्षण देऊन टाकायला हवं होतं. मराठा, आदिवासी, धनगरांना का आरक्षण दिलं नाही. वाजपेयींनीही धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आजही ते आश्वासन पाळलं नाही. तुम्ही का जातीपातीत भांडणं लावत आहेत.
शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला साथ दिली. पण तुम्ही आमचं सरकार खेचलं. शकूनी मामा गद्दारांना घेऊन काम करत आहे. संघाला सवाल आहे. १०० वर्ष घालवली घ्या चिंतन करा. का १०० वर्ष वाया घालावली. आताची भाजप तुम्हाला मंजूर आहे का. पूर्वीचा भाजप वेगळा होता. त्यात पावित्र्य होतं. आताचा भाजप हायब्रिड झाला आहे. संकरीत गायी सारखं. परदेशी वळूंची बिजं गर्भाशयात झाला. तसा भाजप झाला. तो भाजप आमच्यावर राज्य करणार. एवढा वाईट विचार कुणी दिला नव्हता. गद्दार आणि चोरांना नेता मानून राज्य करावं लागतं यातच तुमचा पराभव आहे.
अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाया आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा. आम्हाला वाईट वाटतं एकेकाळचा आमचा मित्र पोखरला जातो. त्यांना सत्ता पाहिजे. कोणी चालेल पण सत्ता पाहिजे. याला म्हणतात सत्ता जिहाद.