“एकनाथ शिंदेंना बाहिरवसा झाला असलं, एखादं मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद उतरून टाका…!”
Thackeray Group Leader Sushma Andhare on Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदावरून अंधारेंनी शिंदेंना टोला लगावला आहे. वाचा सविस्तर...
महाराष्ट्रात अद्यापर्यंत नवं सरकार अस्तित्वात आलेलं नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठ दिवस झालेले असताना राज्याचे मुख्यमंत्री कोण असणार? हे अद्यापपर्यंत ठरलेलं नाही. असं असतानाच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी गेलेले आहेत. शिवाय एकनाथ शिंदे आजारी असल्याची माहिती आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. शिंदेंना बाहिरवसा झाला असलं, एखादं मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद उतरून टाका…!, अशा शब्दात अंधारे यांनी शिंदेंना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी आहे. त्यांच्या प्रकृती ठीक नसल्याने सध्या विश्रांती घेत आहेत. डॉक्टरांचं पथक दरेगावात गेलं होतं. त्यांनी एकनाथ शिंदे यांची तपासणी केली. तब्येत ठीक नसल्याने कुणालाही एकनाथ शिंदे यांना भेटण्याची परवानगी नाहीये. यावरूनच सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. त्यांच्यावरून मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद उतरून टाका, असं अंधारे म्हणाल्या आहेत.
सुषमा अंधारे यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांना लगावला टोला
ताप हाय का..ताप हाय का असं म्हणून नुसताच गाव गोळा काय करताय? बाहिरवसा झाला असंल. तीन वाटाची माती, (सुरतगुवाहाटीगोवा), लिंबू मिरची, काळी बाहुली, उलट्या पखाचं कोंबडं आणि जमलंच तर एखादं मुख्यमंत्रीपद/गृहमंत्रीपद उतरून टाका..! नाही फरक पडला तर EDचा X-ray काढून बघा..!!
ताप हाय का..ताप हाय का असं म्हणून नुसताच गाव गोळा काय करताय? बाहिरवसा झाला असंल. तीन वाटाची माती, (सुरतगुवाहाटीगोवा), लिंबू मिरची, काळी बाहुली, उलट्या पखाचं कोंबडं आणि जमलंच तर एखादं मुख्यमंत्रीपद/गृहमंत्रीपद उतरून टाका..! नाही फरक पडला तर EDचा X-ray 🩻 काढून बघा..!! @PTI_News pic.twitter.com/RTgRoBgDRr
— SushmaTai Andhare (@andharesushama) November 30, 2024
एकनाथ शिंदे दरेगावात
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठ दिवस झाले आहेत. असं असताना सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. तब्बल 230 जागा मिळवत महायुतीने बहुमत मिळवलं खरं, पण नवं सरकार अद्यापपर्यंत स्थापन झालेलं नाही. त्यामागे काही कारणं आहेत, ती अशी की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद हवं आहे. जर मुख्यमंत्रिपद नसेल तर मग गृहखातं शिंदेंना त्यांच्याकडे हवं आहे. यावरून महायुतीत अद्यापपर्यंत खल सुरु आहे. ही सगळी पार्श्वभूमी असताना एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावात आहेत.