Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, काश्मिरात पकडलेल्या चिनी नागरिकाचे मुंबई कनेक्शन, मुंबईतले आधार कार्ड, गुप्तहेर असल्याचा संशय

या चिन्याने तो मुंबईत काम करत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. काही महत्त्वाच्या कामासाठी त्याला आधार कार्डाच गरज होती, त्यामुळे महाराष्ट्रात त्याने आधार कार्ड तयार केल्याची माहिती त्याने पोलि्सांना दिली आहे.

धक्कादायक, काश्मिरात पकडलेल्या चिनी नागरिकाचे मुंबई कनेक्शन, मुंबईतले आधार कार्ड, गुप्तहेर असल्याचा संशय
China spy in kashmir Mumbai connectionImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 8:53 PM

श्रीनगरजम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir)आता पाकिस्तान्यांसोबतच चिनी घुसखोरही सापडू लागले आहेत. काश्मिरातील गांदरबल परिसरातून एका चिनी नागरिकाला (Chinese national arrested )पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून आधार कार्डही (Aadhar card )पोलिसांनी जप्त केले आहे. आता हा चिनी नागरिक केव्हापासून भारतात राहत होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्याकडे आधार कार्ड आले कसे, याचाही उलगडा करण्याच्या पोलीस प्रयत्नात आहेत. जम्मूकाश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर, पाकिस्तान आणि चीनचा बराच तीळपापड झालेला आहे. काश्मिरातील परिस्थिती अशांत राहण्यासाठी पाकिस्तानातून सातत्याने दहशतवाद्यांची घुसखोरी गेल्या काही काळापासून सुरु आहे. तर काश्मिरी पंडित, परप्रांतीय यांचे टार्गेट किलिंगचे प्रकारही वाढले आहेत. अशा परिस्थितीत चीनही पाकिस्तानला मदत करताना दिसतो आहे. जम्मूकाश्मीरमध्ये सातत्याने घातपाती कारवाया घडवून तो भाग अशांत राहावा, आणि जागतिक पातळीवर भारताला बदनाम करावे, यासाठी ते प्रयत्न करतायेत.

मुंबईतून आधार कार्ड तयार केले- चिन्याची माहिती 

चिनी नागरिक लेहकडून श्रीनगरकडे जात होता. पकडण्यात आलेल्या चिनी नागरिक हा ४७ वर्षांचा असून, तो चीनच्या गांसू परिसरातील रहिवासी आहे. या चिन्याने तो मुंबईत काम करत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. काही महत्त्वाच्या कामासाठी त्याला आधार कार्डाच गरज होती, त्यामुळे महाराष्ट्रात त्याने आधार कार्ड तयार केल्याची माहिती त्याने पोलि्सांना दिली आहे. मुंबईतून एका विमानातून तो लेहला आला होता आणि तो मुंबईत परतत असल्याची माहिती त्याने दिली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस गंभीरतेने करतायेत तपास

पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले असून, पोलीस त्याला घेवून चौकशासाठी खोऱ्याच्या बाहेर गेले आहेत. पकडण्यात आलेला चिनी नागरिक हा गुप्तहेर किंवा चिनी अधिकारी असण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले आहे. यासह काही संशयितांना दहशतवाद्यांना हॉटस्पॉट किंवा वायफाय दिल्याच्या कारमावरुनही चौकशीसाठी बोलावले आहे. नागरिकांनी माहित नसलेल्या व्यक्तीला मोबाईल हॉटस्पॉट किंना वायफाय देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.