श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir)आता पाकिस्तान्यांसोबतच चिनी घुसखोरही सापडू लागले आहेत. काश्मिरातील गांदरबल परिसरातून एका चिनी नागरिकाला (Chinese national arrested )पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून आधार कार्डही (Aadhar card )पोलिसांनी जप्त केले आहे. आता हा चिनी नागरिक केव्हापासून भारतात राहत होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्याकडे आधार कार्ड आले कसे, याचाही उलगडा करण्याच्या पोलीस प्रयत्नात आहेत. जम्मू–काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर, पाकिस्तान आणि चीनचा बराच तीळपापड झालेला आहे. काश्मिरातील परिस्थिती अशांत राहण्यासाठी पाकिस्तानातून सातत्याने दहशतवाद्यांची घुसखोरी गेल्या काही काळापासून सुरु आहे. तर काश्मिरी पंडित, परप्रांतीय यांचे टार्गेट किलिंगचे प्रकारही वाढले आहेत. अशा परिस्थितीत चीनही पाकिस्तानला मदत करताना दिसतो आहे. जम्मू–काश्मीरमध्ये सातत्याने घातपाती कारवाया घडवून तो भाग अशांत राहावा, आणि जागतिक पातळीवर भारताला बदनाम करावे, यासाठी ते प्रयत्न करतायेत.
चिनी नागरिक लेहकडून श्रीनगरकडे जात होता. पकडण्यात आलेल्या चिनी नागरिक हा ४७ वर्षांचा असून, तो चीनच्या गांसू परिसरातील रहिवासी आहे. या चिन्याने तो मुंबईत काम करत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. काही महत्त्वाच्या कामासाठी त्याला आधार कार्डाच गरज होती, त्यामुळे महाराष्ट्रात त्याने आधार कार्ड तयार केल्याची माहिती त्याने पोलि्सांना दिली आहे. मुंबईतून एका विमानातून तो लेहला आला होता आणि तो मुंबईत परतत असल्याची माहिती त्याने दिली आहे.
पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले असून, पोलीस त्याला घेवून चौकशासाठी खोऱ्याच्या बाहेर गेले आहेत. पकडण्यात आलेला चिनी नागरिक हा गुप्तहेर किंवा चिनी अधिकारी असण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले आहे. यासह काही संशयितांना दहशतवाद्यांना हॉटस्पॉट किंवा वायफाय दिल्याच्या कारमावरुनही चौकशीसाठी बोलावले आहे. नागरिकांनी माहित नसलेल्या व्यक्तीला मोबाईल हॉटस्पॉट किंना वायफाय देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.