Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवली : आई-बहिणीला वाचवण्यासाठी तरुणीने खदानीत मारली उडी, दोघी वाचल्या पण…

यामध्ये आई आणि लहान मुलीला वाचवण्यात यश आलं असून मोठी मुलगी पाण्यात बुडाल्याचं सांगण्यात येत आहे.

डोंबिवली : आई-बहिणीला वाचवण्यासाठी तरुणीने खदानीत मारली उडी, दोघी वाचल्या पण...
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 5:45 PM

डोंबिवली : डोंबिवली कोळेगाव परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. इथे एका खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई आणि दोन मुली पाण्यात बुडाल्याची माहिती समोर येत आहे. अधिक माहितीनुसार, आई दोन मुलींसह कपडे धुण्यासाठी खदानीत गेली असता लहान मुलगी पाण्यात बुडाली. तिला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे या दोघींनी वाचवण्यासाठी मोठ्या मुलीनेही पाण्यात उडी घेतली. यामध्ये आई आणि लहान मुलीला वाचवण्यात यश आलं असून मोठी मुलगी पाण्यात बुडाल्याचं सांगण्यात येत आहे. (shocking the young girl drowned while rescuing drowned mother and sister in Dombivli)

मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई गीता आणि मुली परी (वय 4 वर्ष) आणि लावण्या (वय 16 वर्ष) अशी पाण्यात बुडालेल्या मायलेकींची नावं आहे. गीता आपल्या दोन मुलींसह कपडे धुण्यासाठी खदानीत गेली होती. खेळता खेळता लहान मुलगी परीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. अशात आपल्या लेकीला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही गीताने पाण्यात उडी घेतली.

परी आणि गीता दोघींना पाण्यात पोहता येत नसल्याने लावण्या घाबरली आणि तिने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. लावण्याने मोठा हुशारीने आई आणि परीचा जीव वाचवला पण दुर्देवाने ती पाण्याच्या प्रवाहात अडकल्याची माहिती देण्यात आली आहे. मानपाड पोलीस सध्या घटनास्थळी लावण्याचा शोध घेत असून आई गीता आणि बहिण परी सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांची मोठी टीम खदानीत लावण्याचा शोध घेत आहेत. आई आणि बहिणीला वाचवून स्वत: मात्र पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. (shocking the young girl drowned while rescuing drowned mother and sister in Dombivli)

इतर बातम्या –

अंबरनाथमध्ये मेफोड्रॉन एम.डी अमली पदार्थ जप्त, एक आरोपी अटक तर एक फरार

Dharavi Corona Update : 8 महिन्यांनी धारावीत चैतन्य, 24 तासात एकही नवा रुग्ण नाही

(shocking the young girl drowned while rescuing drowned mother and sister in Dombivli)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.