मंत्रालयात शॉर्ट सर्किट, वीज पुरवठा खंडित, कामे खोळंबली, अनेक मंत्र्यांची दालने अंधारात
मंत्रालयात पुन्हा एकदा शॉर्ट सर्किट झाला आहे. मात्र, वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे (Short circuit in Ministry)
मुंबई : मंत्रालयात पुन्हा एकदा शॉर्ट सर्किट झाला आहे. मात्र, वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मंत्रालयाच्या जुन्या अनेक्स इमारतीच्या चौथ्या मजल्यावर हा शॉर्ट सर्किट झाला. ट्रान्सफॉर्मर जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांच्या दालनात अंधार आहे. लाईट गेल्याने अनेक विभागाची कामे खोळंबली आहेत. दरम्यान, सध्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे (Short circuit in Ministry).
मंत्रालयात याआधी देखील शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे 2012 साली भीषण आग लागली होती. त्यानंतर 30 मार्च 2020 रोजी देखील भीषण आगीची घटना घडली होती. मंत्रालय हे महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख वास्तू आहे. तिथे सर्व विभागांची कामे चालतात. लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कामे केली जातात. मात्र, अशा ठिकाणी वारंवार शॉर्ट सर्किट सारख्या घटना घडणे ही चिंतेची बाब आहे (Short circuit in Ministry).