मुंबई: मुंबईसह राज्यात कोरोनाच संसर्ग वाढलेला असतानाच कोरोना लसीचा तुटवडाही भासत आहे. मुंबईतील 72 पैकी 26 खासगी व्हॅक्सीनसेंटरमधील लस संपल्याने या 26 ठिकाणचं लसीकरण बंद करण्यात आलं आहे. मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी कोविड सेंटरमध्येही लस संपल्याने या ठिकाणचंही लसीकरण बंद करण्यात आलं आहे. (Shortage hits vaccination at 26 Mumbai hospitals: BMC)
राज्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढ्याच लसी आहेत. मुंबईत लसीचा तुटवडा प्रचंड प्रमाणात निर्माण झाल्याने खासगी लसीकरण केंद्रांवरील लस देणं बंद करण्यात आलं आहे. मुंबईत एकूण 120 लसीकरण केंद्र आहेत. त्यापैीक 49 लसीकरण केंद्रे शासकीय आहेत. या केंद्रावर रोज 40 हजार ते 50 हजार लस दिल्या जातात. बुधवारी राज्यात 14 लाख डोस होत्या. अनेक जिल्ह्यात आज किंवा उद्या कोरोना लसीचा साठा संपेल. केंद्राला याबाबतची माहिती लिखित स्वरुपात दिली असल्याचं आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितलं.
लस संपल्या, बीकेसीवर गोंधळ
मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये आज सकाळी कोरोना लसीचा साठा संपला. पालिकेने शेकडो लोकांना फोन करून कोरोनाची लस घेण्यासाठी बीकेसी केंद्रावर बोलावलं होतं. त्यानुसार शेकडो लोक बीकेसीला आले होते. मात्र, केवळ पाच हजारच लस असल्याने आधी आलेल्या नागरिकांना त्या देण्यात आल्या. त्यानंतर लस संपल्याचं सांगत तसा बोर्डही केंद्रावर लावण्यात आला. त्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले. अपुरा साठा होता तर रांगेत उभं का केलं? लस अपुऱ्या होत्या तर तेवढ्याच लोकांना फोन करून बोलवायचं होतं, सरसकट सगळ्यांना का बोलावलं? साठा संपल्याचं फोनवरून का कळवलं नाही? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांकडून करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पालिकेची अधिकृत माहिती
मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिहगावकर यांनी ट्विट करत कोरोना लस संपलेल्या लसीकरण केंद्रांची माहिती दिली. ट्विटनुसार मुंबईतील वांद्रे बीकेसी कोविड सेंटर, सायन रूग्णालय, सेव्हन हिल हॉस्पिटल, कस्तुरभा रूग्णालय, कूपर हॉस्पिटल, सर्वादय रूग्णालय माहिम, पोदार रूग्णालय, क्रांती सावित्राबाई फुले रूग्णालय याठिकाणी लस उपब्लध नसणार आहे. (Shortage hits vaccination at 26 Mumbai hospitals: BMC)
Vaccination centres which will be operational in #mumbai on 9 April 2021
However due to limited stock this might exhaust at early n few centre will be declared out of stock.
However no worries all centre will start with full capacity asap.
Centres marked red will be closed 2mrw. pic.twitter.com/VGCOWu6kDi— KIRAN DIGHAVKAR (@DighavkarKiran) April 8, 2021
संबंधित बातम्या:
मोठी बातमी : मुंबईतील महत्वाच्या लसीकरण केंद्रावरील लस संपली, बीएमसी अधिकाऱ्याची माहिती
(Shortage hits vaccination at 26 Mumbai hospitals: BMC)