IAS Officer Transfer : नवं सरकार नव्याने बदल्या, पंतप्रधान ऑफिसमध्ये काम केलेला अधिकारी फडणवीसांच्या कार्यालयात

IAS Officer Transfer : शिंदे-फडणवीस सरकारने अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एस.व्ही.आर. श्रीनिवास यांना मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकपदावरून डच्चू देण्यात आला आहे. श्रीनिवास हे शिवसेनेच्या अत्यंत जवळचे अधिकारी आहेत.

IAS Officer Transfer : नवं सरकार नव्याने बदल्या, पंतप्रधान ऑफिसमध्ये काम केलेला अधिकारी फडणवीसांच्या कार्यालयात
नवं सरकार नव्याने बदल्या, पंतप्रधान ऑफिसमध्ये काम केलेला अधिकारी फडणवीसांच्या कार्यालयात Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 6:41 PM

मुंबई: राज्यात ठाकरे सरकार जाऊन एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे. नवं सरकार येताच या सरकारने मंत्रालयात साफसफाईला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सचिवांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. डॉ. श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)यांच्या कार्यालयात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी (Shrikar Pardeshi) यांनी राज्यात विविध पदावर काम केलं होतं. त्यांची कारकिर्द प्रचंड गाजली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान कार्यालयातही काम केलं होतं. केंद्रातील नियुक्तीचा कालावधी आटोपल्यानंतर 2021मध्ये त्यांना पुन्हा राज्यात आणण्यात आलं होतं. त्यांच्याकडे सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपण्यात आली होती. आता त्यांना फडणवीस यांनी आपल्या सोबतीला घेतलं आहे. पंतप्रधान कार्यालयात परदेशी यांनी काम केलेलं असल्याने अनेक प्रकल्प मार्गी लावताना फडणवीस यांना त्यांचा फायदाच होणार आहे.

राज्य सरकारने आज काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. भाऊसाहेब दांगडे यांची कल्याण डोंबिवली महापालिकेत पाठवण्यात आले आहे. दांगडे हे ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ होते. आता त्यांना केडीएमसीत जावं लागणार आहे. तर अश्विनी भिडे यांना पुन्हा एकदा मेट्रोत आणलं आहे. तर अजीज शेख यांची उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंना झटका

शिंदे-फडणवीस सरकारने अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एस.व्ही.आर. श्रीनिवास यांना मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकपदावरून डच्चू देण्यात आला आहे. श्रीनिवास हे शिवसेनेच्या अत्यंत जवळचे अधिकारी आहेत. खासकरून आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. श्रीनिवास हे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते. त्यावेळी त्यांनी अनेक प्रकल्प मार्गी लावले होते. त्यामुळे मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिवसेनेने सत्तेत येताच त्यांच्याकडे सूत्रे सोपवली होती. मात्र, भाजपने सत्तेत येताच त्यांना डच्चू देत अश्विनी भिडे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहेत.

काही प्रकल्पही रद्द होणार

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयांचा फेर आढावा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. जे निर्णय योग्य नाहीत, ज्यात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे, असे निर्णय रद्द केले जाणर असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता सर्वात आधी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर या निर्णयांचा फेर आढावा घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.