राज्यातील राजकारण खळबळ, अजित पवार यांना अडकवण्यासंदर्भात अनिल देशमुखांकडे ते प्रतिज्ञापत्र कोणी पाठवले?
अजित पवार यांनी गुटखा व्यावसायिकांकडून पैसे गोळे करुन द्या, असे सांगितले होते. खूप विचार केल्यानंतर अनिल देशमुख यांनी सही दिली नाही. त्यानंतर ते १३ महिने कारागृहात गेले. न्यायालयाने त्यांना क्लीन चीट दिली, असे श्याम मानव यांनी म्हटले आहे.
राज्यातील राजकारणात खळबळ निर्माण करणारी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी दिली. त्यांच्या दावानुसार खोट्या खटल्यात, अजित पवार, उद्धव ठाकरे, अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांना खोट्या खटल्यानुसार कारागृहात पाठवण्यात येणार होते. परंतु त्याला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांनाच तेरा महिने कारागृहात जावे लागले. दरम्यान, श्याम मानव यांनी केलेला दावा खरा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
काय म्हणतात श्याम मानव
श्याम मानव यांना माध्यमांशी बोलताना सांगितले की, ईडी कारवाईपासून वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांना ऑफर दिली होती. परंतु अनिल देशमुख यांनी ते ऑफर नाकारली. त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना १३ महिने कारागृहात राहावे लागले. त्यांनी सही दिली असती तर उद्धव ठाकरे यांना कारागृहात पाठवता आले असते, असा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी केला आहे.
ती चार प्रतिज्ञापत्र पाठवली कोणी
श्याम मानव यांनी सांगितली की, सत्ता आल्याबरोबर त्यांनी नखे बाहेर काढली. ती नखे आता ओळखली पाहिजे. संजय राऊत यांच्यासंदर्भात काही सिद्ध झाले का? महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांच्याकडे निरोप जात तुमच्याकडे चार प्रतिज्ञापत्र पाठवले आहे. त्या प्रतिज्ञापत्रावर सही करा. पहिले प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवले आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करुन द्या, असे आदेश दिल्याचे होते. दुसरे प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचा मुलगा दिशा सालियान या मुलीवर अत्याचार केला आणि तिचा खून केला, असे होते.
तिसरे प्रतिज्ञापत्र अनिल परब यांच्या गैरव्यवहारावर सही करण्यासंदर्भात होते. चौथे प्रतिज्ञापत्र असे होते की, त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनिल देशमुख यांना बोलवले होते. त्यावेळी पार्थही होते. त्यावेळी त्यांनी ऑफर दिली अजित पवार यांनी गुटखा व्यावसायिकांकडून पैसे गोळे करुन द्या, असे सांगितले होते. खूप विचार केल्यानंतर अनिल देशमुख यांनी सही दिली नाही. त्यानंतर ते १३ महिने कारागृहात गेले. न्यायालयाने त्यांना क्लीन चीट दिली, असे श्याम मानव यांनी म्हटले आहे. परंतु ही चार प्रतिज्ञापत्र पाठवले कोणी? त्याचे नाव श्याम मानव यांनी सांगितले नाही.
देखमुखांनी खूप विचार केल्यानंतर त्यांनी प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा म्हणाले की, तुम्ही हवे तर अजित पवार यांच्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्रावर सही करु नका, परंतु इतर तिघांवर सही करा. परंतु त्यालाही अनिल देशमुख यांनी नकार दिला.