Shambhuraje Desai: 50 कोटी दिले कोणी त्याचा आधी पुरावा द्या; राजकारण सोडून घरी बसतो; शंभूराजे देसाईंचा थेट संजय राऊतांवर हल्लाबोल
शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार 25 वर्ष टिकेल असं सांगितले होतं, पण अडीच वर्षात हे सरकार गेले. त्यानंतर आता शरद पवार सांगत आहेत की, मध्यावधी लागणार, पण तसं काही होणार नसल्याचेही असं शंभूराजे देसाई म्हणाले.
मुंबईः बंडखोरी नाट्यानंतर आमदार एकनाथ शिंदे (Chief Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर हे बंडखोरी नाट्य संपले असले तरी त्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांचे नाट्य सुरू झाले. शिवसेनेतून संजय राऊत यांनी बंडखोर आमदार आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र केल्यानंतर आता बंडखोर आमदारांच्या गटातून जाहीररित्या टीका केल्या जाऊ लागल्या. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामुळेच शिवसेनेवर ही वेळ आली आहे. राऊत यांच्यामुळेच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले 40 आमदार बाहेर पडले आहेत. त्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही अशा शब्दात शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई (Rebel MLA Shambhuraje Desai) यांनी टीका केली आहे.
गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींनंतर शंभूराजे देसाई आज साताऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत शरद पवार बोलतात ते कधीच खरं होत नसल्याचे सांगितले.
शरद पवार सांगतात मध्यावधी लागणार
यावेळी शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार 25 वर्ष टिकेल असं सांगितले होतं, पण अडीच वर्षात हे सरकार गेले. त्यानंतर आता शरद पवार सांगत आहेत की, मध्यावधी लागणार, पण तसं काही होणार नसल्याचेही असं शंभूराजे देसाई म्हणाले.
प्रत्येक आमदाराला 50 कोटी दिल्याचा आरोप
बंडखोर आमदारांना मोठी रक्कम दिल्याची टीका होत असतानाच ते म्हणाले की, प्रत्येक आमदाराला 50 कोटी दिल्याचा आरोप केला जातो आहे, त्यावर बोलताना ते म्हणाले की, पैसे घेतल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून घरी बसेन, आम्ही शिवसेनेत आहोत, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंची शिवसेना पुढे घेऊन आम्ही चाललो असल्याचेही त्यांनी सांगितलं.
आमचा त्यांच्यावर विश्वास
यावेळी त्यांनी प्राप्त परिस्थितीच्या राजकारणावर बोलताना संजय राऊत यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सांगितले की, मैदान आता जास्त दूर नाही. अडीच वर्षानंतर निवडणुका होतील तेव्हा परिस्थिती समोर येईल. आमच्या नेत्याने एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही असा शब्द दिला आहे, आणि आमचा त्यांच्यावर विश्वास असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.