विक्रोळीत बेस्टचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटून बस दुभाजकावर आदळली; 15 प्रवासी जखमी
बेस्टची 27 क्रमांकाची बस भांडुपवरून वरळीला जात असताना हा प्रकार घडला.
मुंबई: पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळीनजीक शनिवारी बेस्टच्या बसला अपघात झाला. यामध्ये बसमधील 15 प्रवाशी जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. जखमींवर सध्या राजावाडी आणि विक्रोळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Bus met with an accident at Eastern Express Highway near Vikhroli Mumbai)
प्राथमिक माहितीनुसार, बेस्टची 27 क्रमांकाची बस भांडुपवरून वरळीला जात असताना हा प्रकार घडला. यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे एक बाईकस्वार बसच्या समोर आला. या बाईकस्वाराला वाचवण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात चालक आणि बसमधील 15 प्रवासी जखमी झाले. ही धडक इतकी जोरात होती की, बसची एक बाजू पूर्णपणे चेपली गेली आहे.
Mumbai: Six passengers injured after a bus met with an accident at Eastern Express Highway near Vikhroli. #Maharashtra pic.twitter.com/5S67wVjpto
— ANI (@ANI) October 17, 2020
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेत अपघाताच्या चौकशीला सुरुवात केली. बसमधील 16 प्रवाशांना किरकोळ स्वरुपात इजा झाली असून सात प्रवासी राजावाडी रुग्णालय, घाटकोपर येथे उपचार घेत असून आठ प्रवासी आंबेडकर रुग्णालय, विक्रोळी येथे तर एका प्रवाशावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोरोनामुळे सध्या मुंबईतील लोकल ट्रेनची सेवा सामान्य लोकांसाठी बंद आहे. केवळ डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि काही शासकीय कर्मचाऱ्यांनाच ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे वाहतुकीचा सर्व भार बेस्ट सेवेवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’कडून सर्व मार्गांवर दररोज जादा बसेस सोडल्या जात आहेत. तर दुसरीकडे वाहतुकीचा सर्व ताण रस्ते वाहतुकीवर आल्याने प्रचंड वाहतूक कोंडीही होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांकडून रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
इतर बातम्या:
मुंबईतील सायन ब्रीज दुरुस्तीच्या कामासाठी 3 दिवस बंद, 72 तासांनी खुला होणार
…म्हणून तूर्तास महिलांना लोकलनं प्रवास करता येणार नाही
(Bus met with an accident at Eastern Express Highway near Vikhroli Mumbai)