Girish Mahajan : …तर माझ्यावर हक्कभंग आणा! क्रीडा क्षेत्रातील भरती प्रक्रियेवर बोलताना गिरीश महाजनांनी थेट आव्हानच दिलं

निर्णय घेऊन 13 वर्षे झाली. तरी अजून 124 तालुक्यांत क्रीडा संकुलांना जागा मिळाली नाही. त्यामुळं काय काय अडचणी आहेत. त्यासाठी बैठक घेऊन त्यातून मार्ग काढू, असंही गिरीश महाजन यांनी सांगितलं.

Girish Mahajan : ...तर माझ्यावर हक्कभंग आणा! क्रीडा क्षेत्रातील भरती प्रक्रियेवर बोलताना गिरीश महाजनांनी थेट आव्हानच दिलं
Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 7:12 PM

मुंबई : क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत आपलं विविध विषयांवर आपलं म्हणणं मांडलं. यावेळी ते म्हणाले, अनेक अडचणी क्रीडाच्या बाबतीत झाल्या. क्रीडा संकुलच्या (sports complex) बाबतीत आपण निर्णय घेतले आहेत. क्रीडा विभागाला आपण जसा न्याय दिला पाहिजे तसा आपण देत नाही आहोत. इतर राज्यांशी तुलना केली तर आपला देश न्याय देत नाही आहे. मी आजच सुचवलं की सगळी रिक्त पद (vacancies) भरली गेली पाहिजे. आजपासून 15 दिवसांत 80 पदं क्रीडा शिक्षकांची भरली असतील. 100 पैकी 80 पद भरली जातील. जर नाही झाले तर माझ्यावर हक्कभंग (disenfranchisement) तुम्ही आणू शकता, असं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलं. त्यामुळं ही भरती प्रक्रिया किती वेगानं राबविली जाते हे पाहावं लागेल.

ग्रामीण भागात क्रीडा साहित्य देणार

पाच लाखांपर्यंत साहित्य क्रीडा साहित्य ग्रामीण भागात देऊ शकतो. सर्व स्थगित ठेवा. पाच लाखांचं बजेट करा. अशा निर्णय घेतला आहे. अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या खेळाडूंचा सन्मान झाला पाहिजे. त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे. खेळाला प्रोत्साहन कसं मिळेल, यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. अपूर्ण असलेली क्रीडा संकुल लवकरच पूर्ण होतील. निर्णय घेऊन 13 वर्षे झाली. तरी अजून 124 तालुक्यांत क्रीडा संकुलांना जागा मिळाली नाही. त्यामुळं काय काय अडचणी आहेत. त्यासाठी बैठक घेऊन त्यातून मार्ग काढू, असंही गिरीश महाजन यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पूरक मागण्या मंजूर करण्याची मागणी

आज पुरवण्या मागण्यामध्ये सगळ्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. हसन मुश्रीफ यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. या संदर्भात लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय देतील. ग्राम सडक योजनेत काम करण्यावर आम्ही लवकरात लवकर सुरु करू. रस्ते, खड्डे या अडचणी मांडल्या गेल्या आहेत. पथदिव्यांचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न असतील. राज्य भरातले प्रश्न मांडले जातील. योग्य ते निर्णय लवकरात लवकर घेतले जातील. स्थानिक संस्था व पंचायत संस्था यांना रकम देण्यासाठी पूरक मागण्या मंजूर कराव्या अशी मी मागणी करत आहे, असंही गिरीश महाजन यांनी म्हंटलं.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....