मुंबई लोकलमध्ये भेदरलेली अल्पवयीन मुलगी, चौकशी केल्यावर धक्कादायक प्रकार आला समोर

मुंबई लोकलमधून अल्पवयीन मुलगी प्रवास करत होती. मध्य रेल्वेच्या दादर लोकलमध्ये ती मुलगी भेदरलेल्या अवस्थेत बसलेली सहप्रवाशांना आढळून आली. सहप्रवाशांनी मुलीची आस्थेवाईकपणे चौकशी करून केली. त्यानंतर धक्कादायक घटना उघड झाली.

मुंबई लोकलमध्ये भेदरलेली अल्पवयीन मुलगी, चौकशी केल्यावर धक्कादायक प्रकार आला समोर
mumbai local (file photo)
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 9:18 AM

सोशल मीडियाची क्रेझ तरुणांप्रमाणे किशोरवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आली आहे. अभ्यासाकडे लक्ष देण्याऐवजी या वयात तासांनतास मुले सोशल मीडियावर घालवत असतात. या सोशल मीडियातून अनोखे प्रेम प्रकरण समोर आले आहे. इन्स्टाग्राम मित्राला भेटण्यासाठी अल्पवयीन मुलगी नेपाळहून भारतात सीमा ओलांडून दाखल झाली. आभासी जगातला मित्र आपला प्रियकर होईल, अशी स्वप्न घेऊन आलेल्या या अल्पवयीन मुलीला मात्र एका वेगळ्याच संकटाला तोंड द्यावं लागले. ज्या प्रियकराने भेटण्यासाठी नेपाळहून बोलावलं होते, त्याला फक्त तिच्या शरीराचा उपभोग घ्यायचा होता, हे त्या अल्पवयीन मुलीला माहीत नव्हते. त्याने लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्या मुलीला वाऱ्यावर सोडून दिले.

सोशल मीडियावर ओळख अन्…

एका १५ वर्षीय मुलीची मुंबईतील मुंब्रा येथील एका मुलाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. त्यातून प्रेम झाले. एकमेकांचे नंबर घेतले गेले. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. त्यानंतर प्रियकराला भेटण्यासाठी १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी थेट नेपाळची सीमा ओलांडून मुंबईत आली. त्या प्रियकारास तिच्याशी लग्न करायचे नव्हते. त्याला फक्त तिचा उपभोग घ्यायचा होतो. त्याने आपला उद्देश साधल्यानंतर विदेशातून आलेल्या मुलीला वाऱ्यावर सोडून दिले. मग ती मुलगी भेदरलेल्या अवस्थेत होती. काय करावे ती कळत नव्हते.

प्रवाशांनी चौकशी केली अन्…

अत्याचाराच्या धक्यात  मुंबई लोकलमधून ती प्रवास करत होती. मध्य रेल्वेच्या दादर लोकलमध्ये ती मुलगी भेदरलेल्या अवस्थेत बसलेली सहप्रवाशांना आढळून आली. सहप्रवाशांनी मुलीची आस्थेवाईकपणे चौकशी करून केली. त्यानंतर धक्कादायक घटना उघड झाली. त्यानंतर प्रवाशांनी तिला दादर स्थानकाच्या पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिच्यावर घडलेला प्रसंग कळला आणि काही तासांतच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. मुंबईकर प्रवाशांमुळे सदर घटना उजेडात आली.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियातून झालेल्या ओळखीमुळे मुले-मुली घर आणि देश सोडून पळून येत आहेत. यावेळी अनेकांची फसवणूक झाल्याचे लक्षात येत आहे. या प्रकारामुळे पालकांनीही सजग राहण्याची गरज आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.