मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल होणार, काही मंत्र्यांचं प्रमोशन तर काहींचं खातं बदलणार, सूत्रांची माहिती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते राज्याच्या राजकारणात मोठं पाऊल उचलणार आहेत. राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल होणार, काही मंत्र्यांचं प्रमोशन तर काहींचं खातं बदलणार, सूत्रांची माहिती
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा फोटो
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 7:13 PM

लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर आता महायुतीचं रखडलेलं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळणार? याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन महाराष्ट्राचं राजकारण अनेकदा तापताना बघायला मिळालं. अनेक नेत्यांकडून उघडपणे मंत्रिपदाची इच्छा याआधी व्यक्त करण्यात आली. पण शिंदे सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झाला नाही. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्य सरकारचा मंत्रिमंड विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजायला आता केवळ 4 महिन्यांचा अवकाश आहे. असं असताना राज्य सरकारकडून नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मराठा समाजाला खूश करण्यासाठी मराठा चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल केला जाईल. तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळणार असल्याचीदेखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मराठा फॅक्टरदेखील दिसण्याचा अंदाज आहे.

मंत्रिमंडळात नेमके काय फेरबदल होण्याची शक्यता आहे

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित आणि सुधीर मुनगंटीवार यांची खाती बजलली जाण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात भाजप नेते रविंद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. आमदार गणेश नाईक आणि आमदार नितेश राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. महिला आमदार माधुरी मिसाळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांना संधी मिळण्याचीदेखील दाट शक्यता आहे.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.