Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूत्रांकडून मोठी बातमी, गणपत गायकवाडांच्या आरोपांवरुन शिंदेंचे मंत्री फडणवीसांसमोर आक्रमक

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराच्या घटनेमुळे राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवरुन शिंदे गटाच्या 7 मंत्र्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

सूत्रांकडून मोठी बातमी, गणपत गायकवाडांच्या आरोपांवरुन शिंदेंचे मंत्री फडणवीसांसमोर आक्रमक
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 10:25 PM

मुंबई | 5 जानेवारी 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणी शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आक्रमक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गणपत गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असे आरोप कसे करु शकतात? असा सवाल मंत्री शंभूराज देसाई यांनी फडणवीसांसमोर केला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी गणपत गायकवाड यांच्या आरोपांवरुन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शिंदेंवर असे आरोप कसे करु शकतात? असा सवाल केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी नरमाईची भूमिका घेतली. गणपत गायकवाड यांनी शिंदेंवर असे आरोप करायला नको होते, असं फडणवीस म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही वाद होते तर माझ्याशी बोलायला हवं होतं, असं फडणवीस म्हणाले. गणपत गायकवाड यांच्या आरोपांचं समर्थन करत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक वाद चर्चेतून मिटला असता, असं फडणवीस म्हणाले.

गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर नेमके काय आरोप केले?

गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुखावर गोळ्या झाडल्या नंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकनाथ शिंदे साहेबांनी असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाळून ठेवले आहेत. यापुढे अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे. माझा निधी जिथे वापरला जातो तिथे खासदार श्रीकांत शिींदे स्वत:चे बोर्ड लावतो. शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांशी गद्दारी केली. ते आता बीजेपीसोबतही गद्दारी करणार आहेत. माझ्यासोबत त्यांनी गद्दारी केली. एकनाथ शिंदेंकडे माझे कोट्यवधी रुपये बाकी आहेत. शिंदे साहेब देवाला मानत असतील तर त्यांनी देवाची शपथ घेऊव सांगावं की माझे किती पैसे बाकी आहेत”, असे आरोप एकनाथ शिंदे यांनी केले आहेत.

शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आम्ही सर्व शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. गोळीबाराच्या विषय वेगळा. पण भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे तथ्यहीन, बिनबुडाचे, ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही, असे आरोप केले. या आरोपांबद्दल आम्ही आमचं मत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलं आहे. हे चुकीचं आहे. त्याअनुषंगाने भाजप पक्षाने योग्य ती कारवाई करावी, असं मत आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार.
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.