महाविकास आघाडीने उलेमांच्या १७ मागण्या मान्य केल्या, त्यातील एक मागणी तर….देवेंद्र फडणवीस यांनी साधला निशाणा

Devendra Fadnavis Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत म्हटले, राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणावे, त्यावर फडणवीस यांनी म्हटले की, अगदी सत्य आहे. आमच्याकडे जो समृद्धी महामार्ग झाला त्याचे नाव बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नाही तर हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे आहे.

महाविकास आघाडीने उलेमांच्या १७ मागण्या मान्य केल्या, त्यातील एक मागणी तर....देवेंद्र फडणवीस यांनी साधला निशाणा
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 11:05 AM

Devendra Fadnavis Interview: उलेमांच्या मागण्या मान्य करण्यासाठी महाविकास आघाडीने लेटर दिले. उलेमांनी १७ मागण्या ठेवल्या होत्या. त्या सर्व मान्य केल्या. त्यातील एक मागणी २०१२ ते २०२४ पर्यंत राज्यात जे दंगे झाले, त्या दंगात मुस्लीम समुदायासंदर्भात ज्या केसेस झाल्या, त्या सर्व केसेस मागे घेण्यात आले. म्हणजेच यालाही बटेंगे तो कटेंगे म्हटले जाते. या मागण्या मान्य केल्या तर आम्ही कसे शांत बसू शकतो. काँग्रेसची या मानसिकतेने देशाचे वाटणी केली आहे. 1920 मध्ये वन्दे मातरम् या घोषणेवरुन काँग्रेसने माघार घेतली तेव्हाच देशात वाटणीची बीजे रोवली गेली, असे देवेंद्र फडणवीस यांनी एनएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

औरंगजेबचा मुद्दा कोण आणतो…

आम्ही गांधींजींना मानतो. अहिंसा मानतो. परंतु समोरचा मारणार आणि आम्ही त्याला उत्तर देणार नाही, असे होऊ शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रत्येक निवडणूक आली की औरंगजेबला त्यात आणले जाते? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगजेबला आम्ही निवडणुकीत आणत नाही. ओवेसी आणतात. ओवेसी म्हणतात, भारत ही रझाकारांची भूमी आहे. परंतु त्यांना आठवण करु द्यावे लागते ही भूमी रझाकारांची नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. ओवेसी संभाजीनगरला पुन्हा औरंगबाद करण्याचे म्हणतात. ते हे कसू करु शकतात? असे फडणवीस यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत म्हटले, राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणावे, त्यावर फडणवीस यांनी म्हटले की, अगदी सत्य आहे. आमच्याकडे जो समृद्धी महामार्ग झाला त्याचे नाव बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नाही तर हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे आहे.

हे सुद्धा वाचा

जे रुग्णालय झाले त्यांचे नाव हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. आता काँग्रेस किंवा राहुल गांधी यांचे सोडा, स्वत: उद्धव ठाकरे यांच्या सभेत हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे नाव घेतले जात नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितले.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.