Sharad Pawar Interview: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या संकेतानंतर बारामतीत अजित पवारांनी प्रचाराचा ट्रॅक बदलला, आता शरद पवार म्हणतात…
Sharad Pawar Exclusive Interview: दहा वर्षांपूर्वी मी सांगितले की डायरेक्ट निवडणूक मी आता लढणार नाही. मी २०१४पासून थेट निवडणुकीत उभा राहिला नाही. आता मी राज्यसभेचा सदस्य आहे. प्रत्यक्षात लोकांमध्ये निवडणूक लढवणे बंद केले आहे. १९६७ साली मी पहिली निवडणूक लढवली. मला ५६ वर्ष झाली आहे.
Sharad Pawar Interview: विधानसभा निवडणुकीत राज्याचे लक्ष बारामतीकडे आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यानंतर अजित पवार यांनी बारामतीमधील प्रचाराचा ट्रॅक बदलला. साहेबांच्या निवृत्तीनंतर तुमची कामे कोण करणार? असा प्रचार अजित पवार करत आहे. त्यामुळे यासंदर्भात शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘टीव्ही ९ मराठीचे’ मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत घेतली. त्यावेळी निवृत्तीचे प्लॅनिंग शरद पवार यांनी सांगितले.
काय म्हणाले शरद पवार
दहा वर्षांपूर्वी मी सांगितले की डायरेक्ट निवडणूक मी आता लढणार नाही. मी २०१४पासून थेट निवडणुकीत उभा राहिला नाही. आता मी राज्यसभेचा सदस्य आहे. प्रत्यक्षात लोकांमध्ये निवडणूक लढवणे बंद केले आहे. १९६७ साली मी पहिली निवडणूक लढवली. मला ५६ वर्ष झाली आहे. आता मला पक्षाचे काम करायचे आहे. संसदेत लोकांमधून डायरेक्ट निवडून येणे हा जसा मार्ग आहे, तसा दुसरा मार्ग आहे. त्यानुसार काम करू शकतो. मी राज्यसभेतच आहे. त्यासाठी मला डायरेक्ट निवडणूक लढवावी लागली नाही. मग रिटार्यमेंट कुठे. पण निवडणुकीला उभं राहायचे नाही.
आमची आयडॉलॉजी वेगळी
प्रत्येकाला कुठेही काम करण्याचा अधिकार आहे. त्या भागाचे भले करायचे असेल. काम करायला कोणी पुढे येत असेल तर तक्रार करायचे काम नाही. पण विचारधारा वेगळी असेल तर… आम्ही कुणाशी संघर्ष करत होतो. त्यांच्या विरोधात अजित पवार निवडणूक लढले आणि त्यांच्याच पंक्तीला जाऊन बसले ही फसवणूक आहे. ज्यांच्यासोबत ते लोक गेले त्यांच्याशी आमचं असोसिएशन नाही. कारण आमची आयडॉलॉजी वेगळी आहे.
लोकसभा वगळता सुप्रिया सुळेंना मी काहीच दिलं नाही. सुप्रिया सुळेंना विधानसभेत इंटरेस्ट नाही. लोक काही चर्चा करतील. पण माझ्या मतानुसार सुप्रिया सुळेंना विधानसभेत इंटरेस्ट नाही. मुख्यमंत्रीबाबत आमच्या पक्षात सर्व नेते बसून निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी सांगितले.