Cruise Drugs Case Update: NCB ची किरण गोसावीच्या चौकशीची ‘ती’ याचिका कोर्टानं फेटाळली
किरण गोसावीच्या चौकशीसाठी आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी कोर्टात सुनावणी होणार आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यावर आम्ही त्यांची चौकशी करू, असे एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी शुक्रवारी सांगितले होते.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने क्रूझ ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावी याची साक्षीदार म्हणून चौकशी करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. मात्र, विशेष एनडीपीएस (Narcotic Drugs and Psychotropic Substances) न्यायालयाने एनसीबी पथकाची विनंती फेटाळली आहे.
विशेष NDPS न्यायालयाने नमूद केले, की किरण गोसावी JMFC न्यायालय, पुणे यांच्या कस्टडीमध्ये असल्याने योग्य ठिकाणी याचिका दाखल करण्यात यावी.
किरण गोसावीच्या चौकशीसाठी आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी कोर्टात सुनावणी होणार आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यावर आम्ही त्यांची चौकशी करू, असे एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी शुक्रवारी सांगितले होते.
28 ऑक्टोबरला पुणे शहर पोलिसांनी 2018 मध्ये झालेल्या 18 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी किरण गोसावी ताब्यात घेतले होते. तो सध्या पुण्यातील येरवडा कारागृह आहे. गेल्या मंगळवारी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
NCB च्या पथकाने 2 ऑक्टोबर रोजी मध्य समुद्रात गोव्याकडे निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील कथित ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात आतापर्यंत दोन नायजेरियन नागरिकांसह एकूण 20 जणांना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा