Mumbai Police : भोंग्याच्या तक्रारीसाठी विशेष अधिकारी, जाणून घ्या नियम मोडल्यास काय होणार शिक्षा

सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा सन 1986 व ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील तरतूदींचे सक्त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानूसार रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये वाजविण्यास सक्त बंदी केलेली आहे.

Mumbai Police : भोंग्याच्या तक्रारीसाठी विशेष अधिकारी, जाणून घ्या नियम मोडल्यास काय होणार शिक्षा
भोंग्याच्या तक्रारीसाठी विशेष अधिकारीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 1:20 PM

मुंबई – मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) प्रत्येक पोलिस स्थानकामध्ये ध्वनी प्रदूषणासंदर्भात एका पोलिस निरीक्षकाची यासंदर्भात नेमणूक केलेली आहे. सदर ध्वनी प्रदूषणाची तक्रार नेमणूक केलेल्या पोलीस निरीक्षकाला (Inspector of Police) नागरिक देऊ शकतात. सण उत्सवाच्या काळात जोरजोरात ढोल वाजवणे व डॉल्बी साऊंड सिस्टीमवरून (Dolby sound system) उच्च आवाजात गाणी लावणे. मोठ्या आवाजाचे फटाके वाजवणे यामुळे ध्वनी प्रदूषण होत असते. ध्वनी प्रदूषणामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असतो. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे राज्य सरकारला तात्काळ हटवण्याचे दिले.

मुंबई पोलिसांकडून जनजागृती अभियान

सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा सन 1986 व ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील तरतूदींचे सक्त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानूसार रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये वाजविण्यास सक्त बंदी केलेली आहे. तसेच सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुध्दा लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये इत्यादी मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत.

नियम मोडल्या काय शिक्षा होऊ शकते

ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण सन 2000 चे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कलम 15 प्रमाणे 5 वर्षे कैदेची किंवा एक लाख रूपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच शिक्षा होऊन सुध्दा असे गुन्हे चालू ठेवल्यास पुढील प्रत्येक दिवसाला पाच हजार रूपये दंडाची तरतूद आहे. तसेच कलम 15 (1) प्रमाणे शिक्षा लागल्याचे 1 वर्षापर्यंतच्या काळात पुन्हा असे गुन्हे केल्यास 7 वर्षे पर्यंतची शिक्षा होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.