SSC Result mahresult.nic.in UPDATE : दहावीचा निकाल आज नाही
दहावीचा निकाल पाहताना तुमचा बोर्ड परीक्षा क्रमांक जवळ असायला हवा.
SSC Result mahresult.nic.in मुंबई : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, आता दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांना आपल्या निकालाचे वेध लागले आहेत. दहावीचा निकाल आज जाहीर होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आज दहावीचा निकाल जाहीर होणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावीच्या बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
“दहावीच्या निकालाबाबत जो मेसेज फिरतोय तो चुकीचा आहे, त्यावर विश्वास ठेवू नये. दहावीच्या निकालाची तारीख बोर्डाने अजून जाहीर केली नाही. निकालाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल.”, अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी दिली.
निकाल कुठे पाहाल ?
दहावीचा निकाल कसा पाहाल?
दहावीचा निकाल पाहताना तुमचा बोर्ड परीक्षा क्रमांक जवळ असायला हवा. जेव्हा तुम्ही रिझल्ट वेबसाईटवर जाल, तेव्हा तिथे परीक्षा क्रमांक टाईप करावा लागले. कुठल्याही स्पेसशिवाय तुमचा परीक्षा क्रमांक टाईप करा. नंतर आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं टाईप करा.
उदाहरणार्थ :समजा तुमचा परीक्षा क्रमांक M123456 असेल आणि आईचे नाव सोनल असेल, तर तुम्ही रिझल्ट वेबसाईटवर पहिल्या कॉलममध्ये M123456 आणि दुसऱ्या कॉलममध्ये म्हणझे आईच्या नावाच्या कॉलममध्ये SON असे टाईप करा. त्यानंतर एन्टर केल्यावर तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल.
दरम्यान, दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. त्यानंतर मग काही दिवसांनी आपापल्या शाळेतून विद्यार्थी निकालाचे प्रमाणपत्र घेऊ शकतात. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीचे बोर्ड दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख, वेळ कधी जाहीर करतं, हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.