ST Bus Strike In Maharashra Live : मुंबई येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना नशिराबाद टोल नाक्यावर अडवले
ST Bus Strike In Maharashra Live : राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यभरातील जवळपास 225 बस डेपोचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. बसस्थानक परिसरात शुकशुकाट बघायला मिळतोय.

ST Bus Strike In Maharashra Live : राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यभरातील जवळपास 225 बस डेपोचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. बसस्थानक परिसरात शुकशुकाट बघायला मिळतोय. एस टी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न जटील बनत चाललाय. मात्र शासनाकडून अजूनही कुठलंही ठोस आश्वासन मिळत नाहीय.
LIVE NEWS & UPDATES
-
मुंबई येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना नशिराबाद टोल नाक्यावर अडवले
जळगाव : मुंबई येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना नशिराबाद टोल नाक्यावर अडवले
एसटी कर्मचाऱ्यांना अडवण्याबाबत पोलीस प्रशासनात आदेश प्राप्त झाल्याची सूत्रांची माहिती
जळगाव नजीक असलेल्या नशिराबाद टोल नाक्यावर मुंबईकडे जाणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अडविले
कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशन नशिराबाद येथे नेण्यात आले.
-
मंत्रालयवरील मोर्चासाठी एसटी कर्मचारी मुंबईसाठी रवाना
नंदुरबार : मंत्रालयवरील मोर्चासाठी एसटी कर्मचारी मुंबईसाठी रवाना
सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने एसटी कामगार मुंबईकडे रवाना
तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील बससेवा ठप्प राहणार
-
-
एसटी संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, वर्धा जिल्ह्यात 40 कर्मचाऱ्यांचे निलंबन
वर्धा – एसटी संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
– वर्धा जिल्ह्यात 40 कर्मचाऱ्यांचे निलंबन
– वर्धा, आर्वी, पुलगाव, हिंगणघाट डेपोतील प्रत्येक 10 कर्मचाऱ्यांचे निलंबन
– 27 तारखेपासून जिल्ह्यात सुरू आहे एसटी कर्मचाऱ्यांचा संप
– जिल्ह्यातील पाचही डेपोतील कर्मचारी आहे संपावर
– जिल्ह्यात वर्धा, आर्वी, पुलगाव, हिंगणघाट, तळेगाव डेपोतील 1665 कर्मचारी आहे संपात सहभागी
– पहिल्या टप्यात 40 कर्मचाऱ्यांचे आज केले निलंबन
-
राज्य सरकार दाखल करणार अवमान याचिका
राज्य सरकार दाखल करणार अवमान याचिका
समिती या संबंधीचा निर्णय घेईल
एसटी कर्मचाऱ्यांचे अंदोलन बेकायदेशीर
गैरसोय टाळण्यासाठी खाजगी वाहानांना परवानगी दिली
कोरोनामुळे एसटी महामंडळ संकटात
-
ST कामगारांच्या 3 मागण्या मान्य, न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत – अनिल परब
न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत – परिवहन मंत्री अनिल परब
न्यायालयाचे निर्णय आम्हाला मानावे लागतील
याचिकेवर उद्या सुनवाणी होईल
ST कामगारांच्या 3 मागण्या मान्य
राज्य सरकार दाखल करणार अवमान याचिका
-
-
नवी दिल्लीत महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी
नवी दिल्लीत महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी
सहा जागांसाठी डिसेंबर महिन्यात निवडणूक
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणार निवडणूक
10 डिसेंबरला मतदान होणार 14 डिसेंबरला मतमोजणी
निवडणुकीचा निकाल जाहीर होणार
मुंबई मधील दोन जागांसाठी निवडणूक
कोल्हापूर धुळे अकोला नागपूर विधान परिषद सदस्यत्वाचासाठी निवडणूक
-
अजूनही महाराष्ट्र सरकारने Sc कमिशनला वानखेडे परिवारावर अन्यायाचा रिपोर्ट पाठवला नाही किरिट सोमय्या यांची प्रतिक्रिया
अजूनही महाराष्ट्र सरकारने Sc कमिशनला वानखेडे परिवारावर अन्यायाचा रिपोर्ट पाठवला नाही.
त्यासंबंधी आज SC कमिशन महाराष्ट्र सरकारला रिमाइंड करणार. अन्यथा समन्स पाठविणार
उद्धव ठाकरे सरकार नीच. नवाब मलिकांररवी नेव्हणीवर आरोप करतात. पुणे पोलिस नीचपणे एक रिपोर्ट करतात.
वानखेडेंवर कारवाई करायची ती करा. पण कुटुंबावर अन्याय नको. किरिट सोमय्या यांची प्रतिक्रिया
-
पालघर जिल्ह्यातील 8 डेपो तर जिल्ह्याभरातील सर्व डेपो बंद
पालघर जिल्ह्यातील 8 डेपो जिल्ह्याभरातील सर्व डेपो बंद आहेत
काल सफाळा व वसई डेपो मधून अंशतः काही बस सुरू होत्या परंतु 10 वाजेनंतर पूर्णतः बंद झाल्या आहेत
दररोज 40ते 45 लाखाच उत्पन्न पालघर, डहाणू, बोईसर ,जव्हार ,वाडा बस डेपो ही पूर्णत बंद आहेत
काल दोन आगारा मधून फक्त 10 ते 15 हजाराचे उत्पन्न मिळालं
काल एका दिवसात जवळपास 40 लाखांच्या वर पालघर विभागाला फटका
-
पालघर जिल्ह्यातील सर्व डेपो बंद
जिल्ह्यात 8 डेपो जिल्ह्याभरातील सर्व डेपो बंद आहेत,
काल सफाळा व वसई डेपो मधून अंशतः काही बस सुरू होत्या परंतु 10 वाजेनंतर पूर्णतः बंद झाल्या आहेत
दररोज 40ते 45 लाखाच उत्पन्न
पालघर, डहाणू, बोईसर ,जव्हार ,वाडा बस डेपो ही पूर्णत बंद आहेत
काल दोन आगारा मधून फक्त 10 ते 15 हजाराचे उत्पन्न मिळालं
काल एका दिवसात जवळपास 40 लाखांच्या वर पालघर विभागाला फटका
-
कल्याणमध्ये दुसऱ्या दिवशी एसटीचा संप सुरुच
ज्यभरात एसटी कामगारांचा संप सुरू आहे या पार्श्वभूमीवर कल्याण एसटी आगारात सुद्धा एसटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केल आहे .दुसऱ्या दिवशीही एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे .त्यामुळे एस टी स्थानकात प्रवासी संख्या कमी आहे .नवी मुंबई ,पनवेल ,भिवंडी साठी प्रवाशांच्या सेवेसाठी एन एम टी व केडीएमटीने जादा बसेस सोडल्या आहेत
-
नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा
नाशिक – एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा
पाठिंबा देण्यासाठी मनसे पदाधिकारी आंदोलनस्थळी दाखल
आम आदमी पाठोपाठ मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली एसटी कर्मचाऱ्यांची भेट..
-
नाशिकमध्ये आम आदमी पक्षाचा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
नाशिक – आम आदमी पक्षाचा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
‘आप’ चे पदाधिकारी पंचवटी डेपोत दाखल
कर्मचाऱ्यांची भेट घेऊन दिला पाठिंबा
एसटी कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा
-
साडेचार हजार एसटी कर्मचारी संपावर, सर्व एसटी स्थानकावर शुकशुकाट
साडेचार हजार एसटी कर्मचारी संमपावर सर्व एसटी स्थानकावर शुकशुकाट
नगर जिल्ह्यात 11 डेपो असून दरोरोज 2 हजार एसटीच्या फेऱ्या
तर 50 लाख दरोरोजच उत्पन्न असून कालपासून 1 कोटींचा महामंडळाला फटका
जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही
-
नारायण राणेंनी हिम्मत असेल पुन्हा वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवून दाखवावी
नारायण राणेंनी हिम्मत असेल पुन्हा वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवून दाखवावी नाही त्यांच डिपॉझीट जप्त केलं तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही.
हिंमत असेल तर उभे रहाचं विधानसभेला
नारायण राणे आज नव्हे भविष्यात कधीही शिवसेनेच्या अंगावर आले तर त्यांना जागा दाखवणार
– विनायक राऊत यांचे जाहीर कार्यक्रमात नारायण राणेंना आव्हान.
-
राज्य सरकारने इंधनावरील VAT कमी कराण्यासाठी भाजपचे आंदोलन
– राज्य सरकारने इंधनावरील VAT कमी करावा,
– एसटी कर्मचारी संप आणि आरोग्य भरतीतील गोंधळाचा निषेध करण्यासाठी भाजपचे आंदोलन,
– भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन,
– महात्मा फुले मंडई चौकात आंदोलन,
– एव्हीआयवरून लाईव्ह फ्रेम चेक करा
-
शरद पवार गृहमंत्री वळसे पाटील यांच्या भेटीला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीला
मुंबईच्या पोलीस आयुक्तांनाही भेटायला बोलावलं
आर्यन खान प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता
ड्रग्ज प्रकरणावर चर्चा होणार असल्याची माहिती
तासाभरापूर्वी संजय राऊत पवारांना भेटले
-
सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू, सोलापुर आगारातील 350 हून अधिक फेऱ्या रद्द
सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू
सोलापूर आगारातील एसटी सेवा झाले ठप्प
350 हुन अधिक फेऱ्या रद्द
काल संपाची माहिती मिळाल्यामुळे आज बस स्थानकाकडे फिरकले नाहीत
बस सेवा संप झाल्यामुळे काल झाले होते सोलापूर विभागाचे पंधरा लाखाचे नुकसान,
तर प्रवाशांचे झाले होते हाल
आज पुन्हा बस सेवा झाली ठप्प
-
एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पिंपरी चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 100 टक्के प्रतिसाद
एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पिंपरी चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 100 टक्के प्रतिसाद मिळालाय
-शहराच्या वल्लभनगर आगारातून आज एक ही बस बाहेर जात नसल्याचे चित्र आहे
-एखादा दुसरा प्रवासी वगळता बस स्थानकावर चिटपाखरूही नाही
-
पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकात महामंडळ कर्मचाऱ्यांच अर्धनग्न आंदोलन
पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकात महामंडळ कर्मचाऱ्यांच अर्धनग्न आंदोलन,
आंदोलनस्थळी कर्मचाऱ्यांकडून घोषणाबाजी
महामंडळाच राज्यशासनात विलीनीकरणाची मागणी
-
रत्नागिरी – गुहागर, चिपळूण, बस डेपो आज बंद, आगारात एकही गाडी नाही!
रत्नागिरी – गुहागर, चिपळूण , बस डेपो आजपण बंद
आगारात एकही गाडी नाही,
बस स्थानक परिसरात शुकशुकाट
एसटी कर्मचारी आजही कामावर परतले नाहीत,
त्यामुळे एसटी वाहतूक कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष
-
नागपुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा पाठिंबा
नागपुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा पाठिंबा
एस टी कर्मचाऱ्यांच्या लढ्यात मनसे खांद्याला खांदा लावून भिडणार
शेवटपर्यंत आंदोलनाला साध देण्याचा मनसेचा शब्द
Published On - Nov 09,2021 10:27 AM





