St Worker Strike : गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून फडणवीस, चंद्रकांत पाटलांचं कौतुक, म्हणाले नवनीत राणा, अनुराधा पौडवाल यांच्यासह…

22 एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर येतील त्यांच्यावर कारवाई करू नका, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना पीएफ, ग्रॅज्युएटी, पेन्शन द्यावी असेही म्हटले आहे. या निर्णावर गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

St Worker Strike : गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून फडणवीस, चंद्रकांत पाटलांचं कौतुक, म्हणाले नवनीत राणा, अनुराधा पौडवाल यांच्यासह...
गुणरत्न सदावर्ते यांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 7:27 PM

मुंबई : आज एसटी कर्मचाऱ्यांबाबत कोर्टाने (High Court) मोठा निर्णय दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना (St Workers) 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहे. जे कामगार कोर्टाने दिलेल्या मुदतीत कामावर येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा तुम्हाला मार्ग मोकळा आहे, असे महत्वाचा निकाल कोर्टाने दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनाही कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कारण 22 एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर येतील त्यांच्यावर कारवाई करू नका, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना पीएफ, ग्रॅज्युएटी, पेन्शन द्यावी असेही म्हटले आहे. या निर्णावर गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच भाजप नेत्यांचे कौतुक केले आहे. तसेच दत्ता सामंतांनी वीरमरण पत्कारलं, मोडणं वाकणं पत्कारलं नाही, त्यांचं सरकार आहे, ज्यावेळेस त्यांची हत्या झाली, आजही कालखंड त्यांचाच आहे, त्यांना मी अभिवादन करतो, डॉ. आंबेडकरांचा पुत्र आहे, त्यांना मी स्मरण करतो, असेही ते म्हणाले.

भाजप नेत्यांचं कौतुक

सदावर्तेंनी भाजप नेत्यांचं कौतुक करताना, कष्टकरी उपाशी मरत होते 5 महिने, उद्धव सरकारने ज्यांना विचारलं नाही, ज्यांनी भुकेला अन्न दिलं,राजकारण नाव असं समजू नये, चंद्रकांत पाटील, फडणवीस, नवनीत राणा, धोंडे, अनुराधा पौडवाल यांनी 5 महिने अन्न दिलं, त्यांचं खरोखर मी कौतुक करतो. त्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानणार नाही, कारण पोटाची भूक त्यांनी भागवलेली आहे, असे सदावर्ते यावेळी म्हणाले. तसेच शरद पवार, अजित पवार यांच्यामुळे 138 मृत्यू झाले, त्यांच्यावर जातीच्या राजकारणाचे आरोप झाले, आज त्यांचा क्लिन बोल्ड केला, आज न्यायालयाने आरसा दाखवला, त्यांचं तोंड पाहण्यासाठी, ते आज गलिच्छ राजकारणी ठरलेले आहेत, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल चढवला.

कोर्टानं कर्मचाऱ्यांना सुखकर गोष्ट दिली

कोर्टाने या कष्टकऱ्यांना सुखकर गोष्ट दिली, पेन्शनच्या बाबतीत न्यायालयाने गांभीर्याने घेतलं, त्यामुळे 18 हजार पेन्शनधारकांना दिलासा मिळाला. ग्राज्युअटी आणि फंडबाबतही न्यायालयाने द्यायला सांगितले, कोविडमध्ये ज्यांनी काम केलं, एका कर्मचाऱअयांना 30 हजार येतात, सर्वांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आम्ही कष्टकऱ्यांचं नेतृत्त्व करताना, बेशर्माच्या फूलासारखं वर्तन पाहायला मिळतं, परिवहन मंत्री अनिल परब नुक्कडवर उभं राहून चेष्टा करता, तुम्हाला खासगी बसेस चालवण्यात जास्त इंटरेस्ट आहे, आम्ही तक्रार करणार आहोत, असेही ते म्हणाले.

परबांवर सदावर्तेंचा हल्लाबोल

तसेच काहींना शिवराळ भाषा लॉलीपॉप वाटतो, न्यायालयाने कर्मचाऱ्यांना मुदत नाही दिली, कष्टकऱ्यांच्या प्रती हा आदेश आहे, पाकिस्तान्यांसारखा अल्टिमेटम नाही. न्यायालयाचे आदेश स्पष्ट आहेत, त्यांचा पगार हा सराकरने द्यावा, सातव्या वेतन आयोगाबाबत कारवाई करायची आहे, त्याबाबत कोर्टाने सांगितलं आहे, ती कारवाई आम्ही सुरु करू, असेही सदावर्तेंनी यावेली सांगितले. या लोकांनी मराठा म्हणून, धनगर म्हणून तोडायचा प्रयत्न केला. पण हिंदुस्तानी नागरिक सरकारला जागेवर आणू शकतात, निकालाचं संपूर्ण वाचन केल्यानंतरच डेपोत जायचं की नाही ठरवू. मस्ती करत असतील अनिल परब, तर आत्महत्यांसाठी तेच जबाबदार असतील, असे म्हणत त्यांनी परबांवरही घणाघाती हल्लाबोल चढवला आहे.

Ajit Pawar: तर आधी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावा; अजित पवारांच्या विधानाचे संकेत काय?

ऊस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान होऊ देऊ नका, अजितदादांच्या सूचना; हार्वेस्टर ताब्यात घेण्याचेही आदेश

‘राऊतांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’ राऊतांच्या स्वागतावरुन राणेंचा खोचक सवाल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.