ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानातून थेट BMC समोर ठिय्या, बोंबाबोंब आंदोलनामुळं पोलिसांची तारांबळ
एसटी कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेसमोर (BMC) आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आझाद मैदानात जाण्याची विनंती केली.
मुंबई : मुंबई महापालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) मुलभूत सोयी सुविधांसाठी आंदोलन सुरु केल आहे. एसटी कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेसमोर (BMC) आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी (Police) आझाद मैदानात जाण्याची विनंती केली. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन सुरु केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळं पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बळ मागवलं. पोलिसांकडून एसटी कर्मचाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रस्त्याच्या मध्यभागी येऊन एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. पोलिसांच्या तीन ते चार गाड्या घटना स्थळावर पोहोचल्या आहेत. पोलिसांनी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. मुंबई महापालिकेसमोर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केलंय. पोलीस आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न करत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचं पाच महिन्यांपासून आंदोलन
गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढतेय त्या प्रकारे त्यांना सुविधा मिळत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. पोलिसांसमोर आंदलोकांना कसं आवरायचं हा प्रश्न आहे. पोलीस आता नेमकी कोणती भूमिका बजावणार आहेत, पाहावं लागणार आहे. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ नये म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत.
पोलिसांची तारांबळ
मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी टॉयलेट आंदोलन सुरू केलं आहे. शेकडो एसटी कर्मचारी रस्त्यावर आंदोलनाला बसले आहेत. भर रस्त्यात एसटी कर्मचारी शौचास बसल्यानं पोलिसांसह प्रशासनाची झोप उडाली होती. आझाद मैदान परिसरात शौचाची सोय, अंघोळीची सेय नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला कुठे शौचास जायचं असा सवाल विचारला आहे.
पाहा व्हिडीओ
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच
एसटी महामंडळाच्या राज्य शासनातील विलीनीकरणासाठी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वी आंदोलनाला सुरुवात केली. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम राहण्याची भूमिका घेत आंदोलन सुरु ठेवलंय. एसटी विलीनीकरणासंदर्भातील प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. राज्य सरकारनं एसटी विलीनीकरण होणार नाही, अशी भूमिका घेतलीय. यासंदर्भातील समितीचा अहवाल देखील सादर करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आज राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत मुंबई महापालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर आंदोलन केलं.
इतर बातम्या
Maharashtra News Live Update : राज ठाकरेंच्या भाषणानंतर वातावरण बदललं, भाजप मनसेची जवळीक वाढणार?