उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा खाली जे सरकार आहे ते मनमोकळेपणाने काम करते; अजितदादांचे मत; अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता
मुंबईः राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) विरोधकांच्या टीकेला जोरदार फटकेबाजी लगावून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कुणावरही अन्याय करणार नाही असे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा खाली जे सरकार आहे त्यात मनमोकळेपणाने काम करत असून नवीन सदस्यांना बोलण्यासाठी संधी देते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, जनतेची कामं […]
मुंबईः राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) विरोधकांच्या टीकेला जोरदार फटकेबाजी लगावून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कुणावरही अन्याय करणार नाही असे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा खाली जे सरकार आहे त्यात मनमोकळेपणाने काम करत असून नवीन सदस्यांना बोलण्यासाठी संधी देते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, जनतेची कामं करण्यासाठी म्हणून मात्र यंदा 9 वाजल्यापासून सभागृह चालू केल आहे. यावेळी विरोधी पक्षांनाही बोलण्यासाठी वेळ दिला आहे. त्यामुळेच यावेळचे अधिवेशन हे अगदी व्यवस्थित आणि सुरळीत पार पडले.राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते.
सरकारच्या योग्य कामामुळे आणि चांगल्या निर्णयामुळेच शक्ती बिलं दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. या बिलाला विरोधकांनीही सहमती दिली आहे.
राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता झाली. अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिवेशनातील महत्त्वाच्या बाबींचा लेखाजोखा मांडला.#MahaBudgetSession2022 pic.twitter.com/tr637efPrg
— NCP (@NCPspeaks) March 25, 2022
आमचं कामावर लक्ष
महाविकास आघाडीने कामावर लक्ष केंद्रीत केले असल्यामुळे आणि विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची आहेत म्हणून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवलं होतं की उत्तर द्यायची आहेत. मात्र राज्यपाल यांच्या अभिभाषणावर बोलता आलं नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, 3 मार्च पासून जे जे काही मुख्यमंत्री यांना जाणवलं आहे आणि ज्या घटना विरोधकांकडून होत होत्या, त्या सगळ्या गोष्टींना त्यांनी समर्पक उत्तरं दिली आहेत.
विरोधकांना समर्पक उत्तरं
तसेच यावेळी त्यांनी जाणीवपूर्वक सांगितले की, आम्ही सरकार मध्ये नवीन नाही, मात्र आम्ही जेव्हा विरोधात होतो तेव्हा जे प्रश्न उपस्थित केले होते त्याला आम्ही उत्तरं दिली नाहीत. विरोधी पक्ष नेत्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्यांना आम्ही समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे असे मतही त्यांनी मांडले.
मुख्यमंत्र्यांनी विजेचा प्रश्न तातडीन सोडवला
विजेच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, विजेचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी तातडीने सोडवला आहे. त्यामुळेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सभागृहात तातडीने त्यांनीही काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. नगरविकासची जी बिलं आहेत त्या त्या शहरांना आणि गावांना पैसे द्यायचे आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंतचा अल्टीमेटम
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, 31 मार्चपर्यंतचा अल्टीमेटम परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. त्यामुळे एसटीमधील असलेले सगळे कामगार ही मराठी माणसं आहेत, त्यामुळे माणसं चुकली की, त्यांना पदरात घ्यायचं असतं अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे अजित पवार यांनी बोलताना सांगितले की, आता मात्र माझी विनंती आहे की आता कोणाच्याही सल्ल्याला बळी पडू नका, एसटी तुमची आहे तुम्ही एसटीचे आहात आता तुम्ही कामावर यावे अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
कामावर रुजू झाला नाही तर कारवाई
एसटी कर्मचाऱ्यांना विनंती करण्याबरोबरच निलंबनही मागे घेऊ असे मत मांडले. मात्र आता कामावर रुजू झाला नाही तर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. याबरोबरच त्यांनी एसटीचा खासगीकरणाचा विचार आमचा नाही, महामंडळासाठी आम्ह 1 हजार बसेस सीएनजीवर चालणाऱ्या घेणार आहोत आणि 2 हजार बसेस आम्ही इलेक्ट्रिक घेणारे आहोत असेही त्यांनी सांगितले. तसेच महामंडळाकडे असणाऱ्या जुन्या बसेस खराब झाल्या आहेत त्यामुळे 7 हजार बसेस आपल्याला लागणार असून ग्राहकांना सुरक्षित प्रवास आम्हाला द्यायचा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
संबंधित बातम्या
CET परीक्षांच्या तारखा जाहीर, उदय सामंतांची ट्विटवरुन घोषणा, ऑनलाईन नोंदणीला सुरुवात