VIDEO: आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करणार नाही, आधी आत्महत्या थांबवा; राज ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
आत्महत्या करणाऱ्यांचं मी नेतृत्व करणार नाही ही माझी अट आहे. त्यामुळे आत्महत्या थांबवा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कामगारांना केलं. (striking MSRTC employees meet raj thackeray at mumbai)
मुंबई: आत्महत्या करू नका. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडू नका. ही लढाई आपल्याला लढायची आहे. त्यासाठी मनगटात रक्त आणि ताकद असायला हवी, असं सांगतानाच आत्महत्या करणाऱ्यांचं मी नेतृत्व करणार नाही ही माझी अट आहे. त्यामुळे आत्महत्या थांबवा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कामगारांना केलं.
एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. कायदेशीर बाजू आणि त्यांचं म्हणणं एसटी कामगारांनी मांडलं. एसटी कामगार नेत्यांनी पोटतिडकीने आपलं म्हणणं मांडतानाच आमचा प्र त्यावेळी राज ठाकरे यांनी मी तुमच्या लढ्याचं नेतृत्व करेन. पण तुम्ही आत्महत्या करू नका ही माझी अट आहे, असं सांगितलं. तसेच मी याबाबत राज्य सरकारशी चर्चा करून तुमच्याशी पुन्हा बोलतो, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी कामगारांना दिलं. राज ठाकरे आणि कामगारांनामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली.
सरकारमध्ये कुणाशी बोलायचं हे राज यांना चांगलंच माहीत
या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधून बैठकीची माहिती दिली. एसटी कामगारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राज्य सरकारशी चर्चा करण्याचं राज ठाकरे यांनी ठरवलं आहे. ते ताबडतोब सरकारशी बोलणार आहे. स्वत: राज ठाकरे जातीनिशी लक्ष घालून हा प्रश्न सोडवणार आहेत. एकदा सरकारशी बोलणं झालं की मग कामगारांशी बोलेन असं आश्वासन राज यांनी दिलं आहे, असं नांदगावकर यांनी सांगितलं. कोणीही आत्महत्या करू नका. आत्महत्या हा काही पर्याय नाही. आपल्याला लढाई लढायची आहे. त्यासाठी आपल्या मनगटात रक्त आणि ताकद हवी. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडायचं नाही. मनसे या लढाईत सोबत राहील, असं आश्वासनही राज यांनी दिलं आहे. राज यांना सरकारमध्ये कोणाशी बोलायचं याची पुरेपूर कल्पना आहे. तेच बोलतील तेव्हा तुम्हाला कळेल. तुम्हालाही माहीत आहे ते कुणाशी बोलतील, असंही ते म्हणाले.
कामगारांसोबत पक्षच नाही तर वकीलही सोबत राहणार
मनसेचे वकील एसटी कामगारांसोबत राहतील. यापुढेही आम्ही त्यांच्यासोबत राहणार. पक्षही असेल आणि आमचे वकीलही राहतील. कायदेशीर लढाई सुरूच राहील. राज ठाकरे यांनी त्यांच्या भावना ऐकल्या. 28 २८ संघटनांनी हा संप जाहीर केला आहे. आता 1 लाख कर्मचारी संघटना बाजूला ठेवून एकत्रं आले आहेत. संघटनाविरहित लढाई लढत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. एसटी महामंडळाचं विलनीकरण करावं ही त्यांची मागणी आहे. राज्य सरकारला उच्च न्यायालयाने 12 आठवड्याची मुदत दिली आहे. समिती गठीत केली आहे. ही माहिती त्यांनी राज ठाकरेंना दिली. सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकरच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला सातवा वेतन आयोग लागू केला तर पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरेल. त्यानंतर विलनीकराची प्रक्रिया सुरू होईल असं या कामगारांचं म्हणणं असल्याचं नांदगावर म्हणाले.
संबंधित बातम्या:
आधी अमृता यांच्याशी पंगा, आता देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस, मलिकांच्या लेकीने शड्डू ठोकला!
गुजरातेतल्या द्वारकेत 350 कोटींचं ड्रग्ज पकडलं, आधी संजय राऊत, आता मलिकांनी भाजपला घेरलं?
(striking MSRTC employees meet raj thackeray at mumbai)