मुंबई महापालिकेचा लसीकरणाबाबत मोठा निर्णय, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडू आणि नोकरदारांसाठी आनंदाची बातमी
मुंबई महापालिकेने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि खेळाडूंना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे (Students and workers going abroad will now get their second dose of covishield vaccine in 28 days in Mumbai)
मुंबई : मुंबई महापालिकेने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि खेळाडूंना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या सर्वांना आता कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी 84 दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. त्यांना आता पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेता येणार आहे. ही सवलत 31 ऑगस्ट 2021 पर्यंत असणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत (Students and workers going abroad will now get their second dose of covishield vaccine in 28 days in Mumbai)
लसीकरणासाठीची आवश्यक कागदपत्रे :
1) परदेशी शिक्षण घेण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : परदेशी विद्यापिठाचे प्रवेश निश्चिती पत्र, परदेशी व्हिसा, परगेशी व्हिसा मिळण्यासाठी संबंधीत विद्यापिठाचे I-20किंवा DS – 160 फॉर्म
2) परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात येऊन पुन्हा शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात जायचे असल्यास संबंधित विद्यापिठ किंवा अभ्यासक्रमाशी संबंधित असलेली अधिकृत कागदपत्रे
3) नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांकडे संबंधित कंपनीचे ऑफर लेटर, मुलाखतीचे पत्र, पुन्हा नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांना एम्प्लॉयर लेटर
4) टोकियो ऑलम्पिकमध्ये भाग घेणारे खेळाडू किंवा अधिकारी यांच्याकडे क्रिडा मंत्रालयाचे अधिकृत पत्र असणे अनिवार्य
मुंबई महापालिकेच्या महत्त्वपूर्ण सूचना
परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार, खेळाडू यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र देतांना त्यावर पारपत्राचा क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. जर पहिला डोस घेते वेळी पुरावा म्हणून पारपत्र दाखवले नसेल तर लसीकरण अधिकाऱ्यांना केवळ पारपत्राचा आग्रह न धरता वेगळे प्रमाणपत्र देता येईल.
लसीकरण केंद्रावरील नोडल अधिकाऱ्यांना परदेशी जाणाऱ्यांसाठीच्या लसीकरणाचा नमुना फॉर्म भरुन घेऊन कोविड पोर्टलवर अपलोड करावा लागेल.
जागतिक आरोग्य संघटनेनं कोविशील्ड लस आपातकालिन वापरासाठी मान्य केल्यानं लसीकरण प्रमाणपत्रात या कोविशील्ड लसीचा उल्लेख आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुरेसा राहिल.