शरद पवार, सुप्रिया सुळे म्हणतात, राष्ट्रवादीत फूट नाही, भाजपला काय वाटतं?; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने थेटच सांगितलं

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार हे आमचेच नेते आहेत, असं म्हटलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वर्तुळातून त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त होऊ लागल्या आहेत.

शरद पवार, सुप्रिया सुळे म्हणतात, राष्ट्रवादीत फूट नाही, भाजपला काय वाटतं?; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने थेटच सांगितलं
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 9:47 AM

मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी एकसंघ असल्याचंच सांगितलं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना वाटत आहे. पण भाजपला नेमकं काय वाटतं आहे? याचे कुतुहूल सर्वांनाच लागलं आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं आहे. त्यामुळे संभ्रमात आणखी भर पडली आहे.

भाजप नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपलाही राष्ट्रवादीत फूट आहे असं वाटत नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला नेतृत्व हवे, अशी भूमिका अजितदादांनी मांडली आहे. राहुल गांधींमध्ये ती क्षमता नाही असं अजितदादांना वाटतंय. आता जर शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे अजितदादा आमचेच नेते असल्याचं म्हणत असतील तर ही भूमिका सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना मान्य असेल असं समजू. जर मान्य नसेल तर राष्ट्रवादीत वैचारिक मतभेद आहेत असं समजू, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पवार हातोडा मारतील

या निमित्ताने अजितदादांची भूमिका म्हणजे राष्ट्रवादीची भूमिका आहे, असं स्पष्ट झालं आहे. त्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचं समजू. त्यामुळे विरोधक जे स्वप्न रंजनात आहेत. त्यावर शरद पवार वैचारिक हातोडा मारतील असं वाटतं, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

राहुल गांधींच्या मागे कसे जातील?

विधीमंडळाचे संसदीय नेते अजित पवार आहेत. त्यांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. अजित पवार देशाच्या प्रगतीसाठी मोदींच्या मागे उभे राहते. तर शरद पवार राहुल गांधी यांच्या मागे कसे उभे राहतील? कारण शरद पवार यांना अजित पवार यांची भूमिका मान्य व्हायला लागली आहे, असं मानायला हरकत नाही. म्हणूनच शरद पवार हे अजितदादा राष्ट्रवादीचे नेते आहेत असं म्हणत असावेत, असंही ते म्हणाले.

आमदारांवर कारवाई करायची नाही

ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनीही पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमदारांच्या अपात्रतेचा जो कायदा आहे, ज्या तरतुदी आहेत. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. याबाबत दोन्ही गटात दुमत नाही. आमच्या पक्षात फूट पडली नाही, असं पवार यांचं म्हणणं आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. असं पवार म्हणाले. वेगळी भूमिका घेतली म्हणून त्या पक्षापासून दूर गेले नाहीत असं पवार यांना सूचवायचं आहे, असं उज्जवल निकम म्हणाले. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना आमदारांवर कारवाई करायची नाही असा त्याचा एक अर्थ होतो. यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असंही ते म्हणाले.

कायदेशीर लढाई लढायची नाही

सुप्रिया सुळे म्हणाल्या आम्ही स्पीकरला कळवलं आहे. पण त्यांनी स्पीकरला काय कळवलं आहे, हे समजायला मार्ग नाही. सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला नाही. मात्र, शरद पवार गटाला कायदेशीर लढाई लढायची नाही असं स्पष्ट होतं आहे. राष्ट्रवादीचे दोन शकले होऊ नयेत, असं त्यांना वाटतं, असंही निकम यांनी सांगितलं.

हेतू काय माहीत नाही

यावेळी अजितदादा गटाचे नेते, मंत्री अनिल पाटील यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार साहेबांनी काय हेतू ठेवून विधान केलं याची कल्पना नाही. त्यांचा माइंड गेम काय याची कल्पना नाही. महाराष्ट्रात अजितदादांमागे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे शरद पवारही येणाऱ्या काळात निर्णय घेतील असं वाटतं. अजित पवार लोकनेते ठरत आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी ते विधान केलं असावं, असं अनिल पाटील म्हणाले.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.