भाजपची मोठी खेळी, ‘या’ सात आमदारांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार?; काय आहे खास प्लान?

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजपने महाराष्ट्रावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. राज्यातील 48 जागा जिंकण्यासाठी भाजपने मिशन 45 प्लस सुरू केलं आहे.

भाजपची मोठी खेळी, 'या' सात आमदारांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार?; काय आहे खास प्लान?
bjp number oneImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 9:41 AM

मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. काहींच्या मते डिसेंबरमध्ये तर काहींच्या मते मार्च-एप्रिलमध्येच या निवडणुका होणार आहेत. कोणतेही अंदाज खोटे निघाले तरी लोकसभा निवडणूक उन्हाळ्यात होणार हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपनेही लोकसभा निवडणुकीत हमखास विजय मिळवण्याचा प्लान तयार केला आहे. या प्लाननुसार भाजप चक्क लोकप्रिय आमदारांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवणार आहे. त्यामुळे यावेळची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्ष्यवेधी ठरणार असल्याचं चित्र आहे.

भाजपचं मिशन 45 प्लस सुरू झालं आहे. लोकसभेत भाजपच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विद्यमान खासदारांना तिकीट देतानाच राज्यातील सहा ते सात आमदारांना तिकीट देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यासाठी राज्यातील सहा ते सात लोकप्रिय आमदारांची यादी तयार करण्यात आली असून या आमदारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राज्यातील महत्त्वाचे आणि लोकप्रिय आमदार आता लोकसभेत दिसण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे आहेत सात आमदार

भाजपचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार, संकटोमोचक गिरीश महाजन, आमदार आकाश फुंडकर, रवींद्र चव्हाण, संजय केळकर आणि राम सातपुते यांना लोकसभेचं तिकीट देण्यात येणार आहे. तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही भाजप लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. हे सातही आमदार लोकसभेच्या मैदानात उतरल्यास अत्यंत चुरशीची निवडणूक होणार असल्याचंही स्पष्ट होत आहे.

या गोष्टी पाहणार

भाजपने लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार देण्यावर भर दिला आहे. प्रत्येक सीट कशी जिंकता येईल यावर भाजपचा सर्वाधिक भर आहे. एकही सीट हारता कामा नये यावर भाजपचा कल आहे. त्यामुळेच आमदाराची लोकप्रियता, उमेदवाराची आर्थिक सक्षमता, मतदारसंघातील जातीय समीकरणं आदी गोष्टी विचारात घेऊनच उमेदवारांना तिकीट देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय काही सेलिब्रिटी, इतर क्षेत्रातील नामवंत हे सुद्धा भाजपमध्ये येणार का? यावरही भाजपचा भर असल्याचं सांगितलं जात आहे.

ते मतदारसंघांवर लक्ष

ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपला वारंवार पराभव पत्करावा लागला, ज्या मतदारसंघात भाजपला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली अशा मतदारसंघांची वर्गवारी करण्यात आली आहे. तसेच या मतदारसंघांवर अधिक फोस करण्यात येत असल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.