आदित्य ठाकरे म्हणजे आजोबांच स्वप्न पूर्ण करणारा, वाघाच हृदय असणारा खरा नातू: मुनगंटीवार

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणारच, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. आदित्य यांच्या या बाणेदार वक्तव्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलं आहे. (sudhir mungantiwar reaction on Aditya Thackeray's statement)

आदित्य ठाकरे म्हणजे आजोबांच स्वप्न पूर्ण करणारा, वाघाच हृदय असणारा खरा नातू: मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 5:46 PM

मुंबई: औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणारच, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. आदित्य यांच्या या बाणेदार वक्तव्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी नामांतर करून दाखवल्यास त्यांचं पहिलं अभिनंदन मी करेन, असं सांगतानाच आदित्य म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असलेला खरा नातू आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरव करू, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (sudhir mungantiwar reaction on Aditya Thackeray’s statement)

सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य यांचं भरभरून कौतुक केलं. आदित्य ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर केल्यास त्यांची ऊंची तरुणांच्या मनात सह्याद्रीच्या पर्वतापेक्षा मोठी होईल. संभाजी महाराज देवासोबत जिथे कुठे बसले असतील तिथून त्यांना आशीर्वाद देतील. विधानसभेत भाजपतर्फे आदित्य यांच्या अभिनंदानाचा प्रस्ताव मांडणारा आमदार मी असेन, असं सुधीर मुनंगटीवार यांनी सांगितलं.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दूरदूरपर्यंत सत्तेचा मोह नव्हता. त्यांनीच औरंगाबादकरांना औरंगाबादचं नामांतर करण्याचं वचन दिलं होतं. आजोबांचं हे स्वप्न जर नातू पूर्ण करत असेल तर अधिवेशनाच्या पहिल्याच भाषणात मी त्यांचं मोठ्या मनाने अभिनंदन करेल. आजोबांचं स्वप्न करणारा वाघाचं हृदय असलेला खरा नातू म्हणून त्यांचा गौरव करू, असंही ते म्हणाले.

आदित्य काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादेत कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल विचारत असतात, पण त्यांनी पाच वर्षे केलं काय.? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का?; असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केलंय. पुढे पुढे पाहा काय होतंय..! महाविकास आघाडीचं एकमत करूनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्यासोबतच शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही सोडवत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. (sudhir mungantiwar reaction on Aditya Thackeray’s statement)

संबंधित बातम्या:

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात…

अमेरिकेत गुंडगिरी करून ट्रम्प यांच्याकडून माझ्या पक्षाची बदनामी; आठवलेंची टीका

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलन, चंद्रकांत पाटलांचा इशारा

(sudhir mungantiwar reaction on Aditya Thackeray’s statement)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.