शिवाजी महाराजांची ‘जगदंबा तलवार’ आणण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री जाणार इंग्लडला, MOU वर सह्या होणार

shivaji maharaj jagdamba talwar : शिवाजी महाराजांची जगदंबा तलावर भारतात आणण्यासाठी जोरात हालचाली सुरु केल्या आहेत. राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार ही तलवार आणण्यासाठी पुढील महिन्यात ब्रिटन दौऱ्यावर जाणार आहेत.

शिवाजी महाराजांची 'जगदंबा तलवार' आणण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री जाणार इंग्लडला, MOU वर सह्या होणार
shivaji maharaj jagdamba talwar
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 12:54 PM

मुंबई : महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटनमध्ये असणारी जगदंबा तलवार आणि वाघ नखे महाराष्ट्रात येणार आहे. ही तलवार आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी जून महिन्यात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ब्रिटनमध्ये जाणार आहे. त्याठिकाणी यासंदर्भात एमओयुवर (Memorandum of understanding) सह्या करण्यात येणार आहे. वाघनखे आणि जगदंबा तलवार भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटीश उपउच्चायुक्त ॲलॅन गॅम्मेल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद होता.

काय म्हणतात मुनगंटीवार

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवरा पुढील महिन्यात जगदंबा तलवार आणि वाघ नखे आणण्यासाठी ब्रिटन दौरा करणार आहे. याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जगदंबा तलवार आणि वाघ नखे आणण्यासंदर्भात माझी ब्रिटनचे उपउच्चायुक्त कॅम्मेल यांच्यांशी चर्चा झाली होती. त्यांनी यासंदर्भात सहमती पत्रावर (एमओयु) हस्ताक्षर करण्यास तयारी दर्शवली.

हे सुद्धा वाचा

राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कार्यक्रम

राज्यात छात्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे होत आहे. त्यानिमित्ताने राज्यात शंभरपेक्षाही जास्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, शिवाजी महाराजांचे वंशज आणि अन्य नागरिकांना बोलवण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्य शासन राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे ब्रिटनकडून आणण्यात येणार आहे.

ब्रिटनमध्ये कुठे आहे तलवार

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगदंबा तलवार सध्या ब्रिटनमधील Marlborough House मध्यल्या इंडिया हॉल मधील Case of Arms मध्ये आहे. लंडनच्या रॉयल कलेक्शनमध्ये असणारी तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांची असून तिचे पूर्वापार चालत असलेले नाव जगदंबा असल्याचंही स्पष्ट झालं आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खान याला मारण्यासाठी वापरलेली वाघ नखेही ब्रिटनमध्ये आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.