आधी तोंडाला फेस आणला, आता…; उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सुधीर साळवी यांचा मोठा निर्णय काय?

सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' येथे भेट घेतली तेव्हा तिथे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि माजी खासदार विनायक राऊत देखील उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी सुधीर साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली.

आधी तोंडाला फेस आणला, आता...; उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सुधीर साळवी यांचा मोठा निर्णय काय?
सुधीर साळवी आणि अजय चौधरी
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 10:40 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवडी मतदारसंघावरुन अंतर्गत पेच निर्माण झाला होता. शिवडी विधानसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. अजय चौधरी हे ठाकरे गटाचे विधीमंडळातील गटनेते आहेत. तसेच ते शिवडी मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. असं असलं तरीही शिवडी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाला होता. कारण ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधीर साळवी यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त झाली होती. त्यांच्या या मागणीमुळे ठाकरे गटात शिवडी मतदारसंघाचा निर्णय घेण्यास विलंब झाला. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत गटनेता असलेले अजय चौधरी यांचंच नाव नव्हतं. त्यामुळे शिवडी मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. तसेच साळवी यांनी व्यक्त केलेल्या इच्छेने अजय चौधरी यांच्या तोंडाला फेस आणला होता. पण आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांना घरी बोलावून त्यांची समजूत काढल्याने अजय चौधरी यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ येथे भेट घेतली तेव्हा तिथे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि माजी खासदार विनायक राऊत देखील उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी सुधीर साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

“सुधीर साळवी आमच्या घरातला मुलगा आहे. राग, रुसवे होऊ शकतात. पण नाराज नाही. तो नाराज नव्हताच. सुधीर सकाळीच क्लिअर झाला होता. तो व्यवस्थित काम करून ही सीट जिंकून आणेल. सुधीर साहेबांच्या जवळचा मुलगा आहे. काही प्रॉब्लेम नाही, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. यावेळी किशोरी पेडणेकर यांना आपणदेखील इच्छुक होता का आणि आपण नाराज आहात का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मी नाराज नाही. इच्छुक होणे स्वाभाविक आहे. पण मला बरेच पदं मिळाली आहेत”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

विनायक राऊत काय म्हणाले?

“माजी खासदार विनायक राऊत यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. सुधीर साळवी हे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांना येऊन शब्द दिलेला आहे. मी शिवसैनिक आहे. शिवसैनिकांची कर्तव्य शंभर टक्के पूर्ण करणार आणि मशालचा आमदार ‘मातोश्री’वर घेऊन येणार अशा पद्धतीचा शब्द त्यांनी दिलेला आहे”, असं विनायक राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“साहजिकच ते इच्छुक होते. त्यांना पण आमदारकी मिळाली पाहिजे. असे स्वप्न पाहणे किंवा इच्छा व्यक्त करणे चूक नाही. सुधीर साळवींसारखा निष्ठावंत शिवसैनिक तेवढ्याच ताकदीने ज्यांना उमेदवारी अजय चौधरींना दिली आहे त्यांना निवडून आणण्याचा निश्चय केलेला आहे. त्यांच्या बाबत पक्ष नक्कीच विचार करणार”, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.